कोंढवा खुर्द सर्व्हे नंबर 42,ग्रीन पार्क रोडमध्ये परवानगीशिवाय उत्खनन; अँटी करप्शन स्क्वॉडकडून तक्रार,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे : कोंढवा खुर्द येथील सर्व्हे नंबर 42, ग्रीन पार्क रोड परिसरात एका बिल्डरकडून परवानगीशिवाय उत्खनन केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बिल्डरने अवघ्या एका गुंठ्यात मोठा खड्डा खोदण्याचे काम सुरू केले असून कोणतीही शासकीय महसूल खाते व गौण खनिज विभागाची परवानगी घेतलेली नसल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात गौण खनिज विभाग तसेच महसूल खात्याकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याचा आरोप आहे. याबाबत अँटी करप्शन स्क्वॉडचे ऑल इंडिया प्रेसिडेंट वाजिद खान यांनी तलाठी कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित बिल्डरवर बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी किमान 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात यावी,

तसेच आवश्यक परवानगी न घेता काम सुरू केल्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येणार असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी वाजिद खान यांच्याकडून करण्यात आली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
