Breaking NewsLatest NewsPMC News

कोंढवा खुर्द सर्व्हे नंबर 42,ग्रीन पार्क रोड मध्ये परवानगीशिवाय उत्खनन; अँटी करप्शन स्क्वॉडकडून तक्रार, वाजिद खान यांचा इशारा,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे : कोंढवा खुर्द येथील सर्व्हे नंबर 42, ग्रीन पार्क रोड परिसरात एका बिल्डरकडून परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या दो गुंठ्यात मोठा खड्डा खोदण्याचे काम सुरू असून यासाठी कोणतीही शासकीय महसूल खाते किंवा गौण खनिज विभागाची अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे.


या प्रकरणी अँटी करप्शन स्क्वॉडचे ऑल इंडिया प्रेसिडेंट वाजिद खान यांनी तलाठी कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित बिल्डरवर बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी किमान 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करावी, तसेच आवश्यक परवानगी न घेता काम सुरू केल्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


तसेच, वाजिद खान यांनी इशारा देताना म्हटले आहे की, अशा बेकायदेशीर बांधकामांविरोधात आणि काही जणांकडून वापरल्या जाणाऱ्या फेक आयडीच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात अँटी करप्शन स्क्वॉड जोरदार आवाज उठवणार आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येणार असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *