पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध धंद्यांना उधाण? दक्षिण म्हाळुंगे पोलिस स्टेशन – दर्शन हद्दीत “जुगाड” सुरू असल्याचा आरोप?? apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पिंपरी-चिंचवड : दक्षिण म्हाळुंगे पोलिस स्टेशन – दर्शन हद्दीत अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “जुगाड” पद्धतीने विविध बेकायदेशीर कामे सुरू असून, काही कथित वसुली करणाऱ्यांच्या मेहरबानीने ??हे धंदे चालत असल्याची चर्चा परिसरात आहे??

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भागात जुगार, अवैध व्यवहार उघडपणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाकडे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय लक्ष देणार का? तसेच संबंधितांवर कठोर कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
