Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC News

जुनी जिल्हा परिषद इमारतीसमोरील मुतारीची दयनीय अवस्था; स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप??apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


पुणे : शहरातील जुनी जिल्हा परिषद इमारतीसमोर असलेल्या सार्वजनिक मुतारीची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे समोर आले आहे. घाण, दुर्गंधी, साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसरामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मुतारीच्या स्वच्छतेकडे संबंधित मुकादम आणि एसआय यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


दररोज हजारो नागरिक विविध शासकीय कामांसाठी जिल्हा परिषद इमारतीत येत असतात. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असताना परिसरात फक्त एकच मुतारी असून तिची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुतारीमध्ये साचलेले घाण पाणी, तुटलेली व्यवस्था आणि अस्वच्छ वातावरण यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


शासकीय कार्यालयांच्या परिसरातच अशी अस्वच्छता दिसत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन नियमित स्वच्छता व दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *