महालुंगे परिसरात खुलेआम गांजा विक्रीचा आरोप; स्थानिक नागरिकांमध्ये संताप,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पिंपरी-चिंचवड परिसरातील चाकण-तळेगाव रोडवरील महाळुंगे (इंगळे) येथे अवैध धंदे सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हद्दीतील एका लॉजच्या शेजारी असलेल्या दुकानामध्ये लेस व पाण्याच्या बाटल्यांच्या जाहिरातीच्या नावाखाली खुलेआम गांजा विक्री होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, हा परिसर औद्योगिक क्षेत्र असून येथे अनेक कंपन्या व व्यावसायिक आस्थापना आहेत. तसेच बाहेरून मोठ्या प्रमाणात मजूर कामासाठी येत असतात. अशा परिस्थितीत खुलेआम सुरू असलेल्या कथित गांजा विक्रीमुळे तरुण वर्ग व कामगारांवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, इतक्या खुलेआमपणे सुरू असलेल्या या कथित अवैध धंद्याची माहिती महाळुंगे पोलीस स्टेशनला नाही का? संबंधित दुकानाचा पत्ता माहित असूनही हा प्रकार सुरू असल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. काही नागरिकांनी “हा धंदा नेमका कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी यापूर्वी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, तरीदेखील परिसरात कथित गांजा विक्री सुरू असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.“पोलीस प्रशासनाची भीती नसल्याप्रमाणे संबंधित व्यक्ती बिनधास्तपणे गांजा विक्री करत आहे.

आता या प्रकरणात पोलीस प्रशासन ठोस कारवाई करणार का?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, अशी जोरदार मागणी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
