Breaking NewsLatest NewsPMC News

पुणे महापालिकेतील 10 नगरसेवक अडचणीत; अनधिकृत बांधकाम प्रकरणी अपात्रतेची शक्यता ?apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे महापालिकेतील तब्बल 10 नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अंतिम सुनावणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

पुणे :अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींमुळे पुणे महापालिकेतील तब्बल 10 नवनिर्वाचित नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आली आहे. प्राथमिक चौकशीत काही नगरसेवकांकडे आवश्यक बांधकाम परवानगी नसल्याचे समोर आल्यानंतर निवडणूक कार्यालयाने अंतिम सुनावणीचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे.

शहर अभियंता विभागाने या तक्रारींची चौकशी केली असता, संबंधित नगरसेवकांनी केलेल्या बांधकामांची महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे कोणतीही परवानगी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या प्रकरणात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील नगरसेवकांचा समावेश असून, महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 10 (ड) अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तरतुदीनुसार निवडणुकीपूर्वी केलेले अनधिकृत बांधकामही अपात्रतेचे कारण ठरू शकते.सध्या काही नगरसेवकांच्या सुनावण्या सुरू असून उर्वरित प्रकरणांचे अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

हे’ १० नगरसेवक रडारवर!

अनधिकृत बांधकामांची तक्रार असलेल्या आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले नगरसेवक हे सर्व पक्षी असल्याचे समोर आले. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे??. व्यंकोजी खोपडे, वैशाली बनकर, सुरेखा कवडे, शीतल सावंत, काशिफ फखरूल हसन अली सय्यद, संगीता दांगट, रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे, प्राची आल्हाट, नंदा आबनावे ही नावे आहेत.???

सुनावणीचा पहिला टप्पा पूर्ण

निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ५ नगरसेवकांचे अहवाल अंतिम सुनावणीसाठी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. यातील ४ नगरसेवकांची पहिली सुनावणी प्रक्रिया पार पडली असून, काहींनी पुढील वेळ मागून घेतली आहे. उर्वरित नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामाबाबत शहर अभियंता कडून अंतिम अहवाल मागवण्यात आला असून, तो येताच पुढील कारवाईची कुऱ्हाड कोसळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

त्यामुळे संबंधित नगरसेवकांच्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://www.instagram.com/p/DacIrNoMX7u/?igsh=MWkzZTZpdmR5ODZ6Nw==

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *