Crime NewsPMC News

पुणे : वेल्हेतील हॉटेल मालकावर कोयत्याने हल्ला करून हवेत गोळीबार करणारे २४ तासांत गजाआड; वेल्हा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

येथील वेल्हा पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत हॉटेलवर हल्ला करून गोळीबार करणाऱ्या आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या ४ आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा (नाबालिग) समावेश आहे.


वेल्हा (पुणे ग्रामीण): जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील कोदवडी फाटा परिसरातील हॉटेल श्रीनाथ येथे झालेल्या खुनाच्या प्रयत्न आणि फायरिंग प्रकरणातील आरोपींना वेल्हे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

https://www.instagram.com/reel/DYxCqoGsIMH/?igsh=MWI4aWdicXFma2dpYw==

नेमकी घटना काय?
​२४ मे २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कोडवडी फाटा येथील एका हॉटेलमध्ये ही खळबळजनक घटना घडली होती. जुन्या भांडणाची कुरापत काढून मुख्य आरोपी गणेश धरपाळे व त्याच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांनी हॉटेल मालक मस्कु दसवडकर व वेटर दशरथ शिळीमकर यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर, परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी हवेत गोळीबार (फायरिंग) केला आणि तिथून फरार झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. जखमी हॉटेल मालक मस्कु दसवडकर यांनी या प्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.


घटनेनंतर वेल्हे पोलीस हवालदार सोमेश राऊत, तातडीने तपास सुरू करत गोपनीय माहितीच्या आधारे सुळवड व बांजळे गाव परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यामध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये गणेश उर्फ तानेश तानाजी धरपळे (रा. बांजळे), ओंकार सुरेश इंगळकर व विशाल आप्पा इंगळकर (रा. सुळवड) यांचा समावेश आहे. आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न, फायरिंग आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी,वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, पोलीस हवालदार सोमेश राऊत, पोलीस शिपाई आकाश पाटील, अजय गार्डी, बुद्धीवान मोरे आणि चालक सचिन जाधव यांच्या टीमने ही यशस्वी कामगिरी बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *