नाकाबंदीत २७ वर्षीय तरुणाने पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकावर केला कोयत्याने प्राणघातक हल्ला..

नाकाबंदीत २७ वर्षीय तरुणाने पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकावर केला कोयत्याने प्राणघातक हल्ला..

A 27-year-old youth in a blockade attacked a police inspector and a police sub-inspector with a scythe.

करोनाला नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत अाहेत,

मात्र काही समाजकंठक नागरिक कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

असून एका २७ वर्षीय आर्किटेक्ट तरुणाला पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान हटकले असता तरुणाने पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार

मरिन ड्राईव्हला येथे घडला आहे. पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणारा करण नायर या २७ वर्षीय अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान तरुणाला हटकलं असता त्याने बॅगेतून कोयता काढला आणि पोलिसांवर हल्ला केला.

या हल्ल्यात पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके जखमी झाले. हल्ला केल्यानंतर त्याने पळ काढला.

यानंतर पोलिसांनीही त्याचा पाठलाग करत थांबवण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस पाठलाग करत असतानाही तरुण थांबण्याचं नाव घेत नव्हता.

अखेर पोलिसांनी काठी आणि दोरीच्या सहाय्याने त्याला पकडलं आणि अटक केली.

पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतानाही तरुण काहीच ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता.

तरुणाच्या कुटुंबाने गेल्या दोन महिन्यांपासून तो विचित्र वागत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. आरोपीची आई एअर इंडियामध्ये कामाला आहे.

आर्किटेक्ट असल्याने बांबू कापण्यासाठी त्याने कोयता आणला होता असा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *