अजितदादांच्या गडाला धक्का! मुस्लिम समाजातील दोन माजी नगरसेवक व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडण्याच्या तयारीत,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुस्लिम समाजातील दोन माजी नगरसेवक आणि काही कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुणे, कोंढवा खुर्द — अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोंढवा खुर्द परिसरातील दोन माजी नगरसेवक तसेच अनेक कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
अजितदादांच्या आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या विरोधात अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, यामुळे स्थानिक मुस्लिम समाज व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मुस्लिम समाजाने सांगितले की, अजितदादा नेहमी ‘सेक्युलर’ मूल्यांबद्दल बोलतात, पण प्रत्यक्षात मुस्लिम समाजावरच अन्याय होत आहे. धर्म, नाव आणि जातीच्या आधारावर मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात असून, याबाबत पक्षातील कोणीही बोलत नाही.
कोंढवा परिसरातील कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून अन्य पर्यायांचा विचार करत आहेत. यामुळे अजित पवार यांच्या गडाला मोठा धक्का बसणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.??
माहितीनुसार, मुस्लिम समाजाने अनेकवेळा सत्ताधारी पक्षाकडे आपल्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी केली, मात्र अजित पवार यांच्या गटाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.सूत्र ची माहिती,???

सदर मुस्लिम समाजानी असा आरोप केला आहे की, “भाजप नेहमी मुस्लिम समाजाच्या विरोधात आवाज उठवत असते, आणि अजितदादा पवार यांचा पक्ष सत्तेत असूनही मुस्लिम समाजाच्या हितासाठी काहीच करत नाही.”

या नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत हे माजी नगरसेवक आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते पक्षत्यागाची घोषणा करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

