ताथवडेतील गॅस स्फोट प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल, जागामालकासह तिघांना अटक.वाकड पोलीस स्टेशनची कामगिरी.apcs.news
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ताथवडेतील गॅस स्फोट प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल, जागामालकासह तिघांना अटक.अवैध रित्या गॅसची चोरी करुन स्फोटास, मानवी जीवीतास व मालमत्तेस नुकसान करण्यास कारणीभुत असलेल्या तीन आरोपींना वाकड पोलीसांनी घेतले ताब्यात.
दि. ०९/१०/२०२३.(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
गॅस स्फोट प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल; तिघेजण ताब्यात.ताथवडे येथील गॅस स्फोट प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी (दि. 8) जेएसपीएम कॉलेज परिसर ताथवडे येथे घडली.

ताथवडेतील गॅस स्फोट प्रकरणी चार जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. : ताथवडेतील गॅस स्फोट प्रकरणी चार जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुलकुमार राजदेवराम (रा. थेरगाव), मोह. रशीद मोह. नसीम (रा. अलाहाबाद प्रयागराज), चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) यांच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाकडचे पोलिस उपनिरीक्षक भारत माने यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ९) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.महिपाल चौधरी आणि आरोपी राहुलकुमार या दोघांनी तिरुपती कॅरिअरच्या गॅस टँकर चालक मोहम्मद रशीद याच्याशी संगनमत करून गॅसची बेकायदेशीरपणे चोरी केली. गॅसचे टँकर गाडी क्र GJ 16 AW 9045 मधुन नोजल पाईप द्वारे गॅस चोरुन व्यावसाईक गॅस टाक्या भरण्याचे चालु असताना गॅस लिकिज झाल्याने स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निष्पन्न झाले. जागामालक चंद्रकांत सपकाळ यांनी नियमितपणे आपली जागा उपलब्ध करून दिली. घटनेनंतर टँकर चालक पळून गेला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
(डॉ. काकासाहेब डोळे) पोलीस उप आयुक्त, परि-२, पिंपरी चिंचवड
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad