Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

मित्र-मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी घातली पोलिसांची वर्दी; चतुःश्रृंगी पोलिसांची कामगिरी.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे :(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

प्रेयसीवर इम्प्रेशन मारण्यासाठी डिलिव्हरी बॉय पोलीस कर्मचाऱ्यांचा ड्रेस घालून तोतया पोलीस बनला. मात्र पायातील चप्पलने त्याचे बिंग फुटले आणि पोलिसांच्या बेड्या हातात पडल्या.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

यशवंत रमेश धुरी (वय 30, रा. तापकीरनगर, काळेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवलदार श्रीकांत किसन वाघवले यांनी तक्रार दाखल केली आहे.

मित्र मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने आपण पोलीस असल्याचे सांगत पोलिसांचा गणवेश घातला. पण, पेट्रोलिंग करणार्‍या चतु:श्रृंगी पोलिसांनाच त्याने औंध चौकीत नेमणूकीला असल्याचे सांगितल्याने त्याचे बिंग फुटले. पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.यशवंत रमेश धुरी (वय ३०, रा. तापकीरनगर, नडे कॉलनी, काळेवाडी – असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २९८/२३) दिली आहे. हा प्रकार औंधमधील नागरस रोडवरील राम नदीच्या पुलावर रविवारी दुपारी दीड वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक आणि पोलीस नाईक यांच्यासोबत त्यांचे सहकारी हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते.त्यावेळी राम नदीच्या पुलावर एक पोलीस उभा असल्याचे त्यांना दिसले.जवळ जाऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता तो अनोळखी वाटल्याने पोलिसांनी त्याला नेमणुकीस कोठे आहे, असे विचारले असता त्यानी पोलिस असल्याचे सांगितले. त्याने औंध चौकीला पोलीस असल्याचे सांगितले. त्याच्या ड्रेस वरील खांद्यावर लावलेला बिल्ला हा महाराष्ट्र पोलीस अशाप्रकारचा होता आणि पायात चप्पल होती.खाकी ड्रेसच्या म. पो. कॅपवर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिलेले होते.त्यामुळे तो खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणले..



अधिक चौकशी केली असता तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत असून मित्र मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने हा गणवेश घातला असल्याचे सांगितले.
पोलीस हवालदार कापरे तपास करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *