दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पेट्रोलिंग करीत असताना तडीपार आरोपीला अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
आज दि.१२/०८/२०२१ रोजी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा,
यांचेकडील अधिकारी व कर्मचारी हे वा भनवडी व हडपसर व पोलीस स्टेशन च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक मनोज खरपुडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार सध्या तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार सुंदर मोहन कचरावत हा वानवडी पोलीस स्टेशन च्या हद्दीत जे एस पी एम कॉलेज जवळ कोयत्यासारखे हत्यार घेऊन फिरत आल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सुंदर मोहन कचरावत,वय 33 वर्षे रा.जे.एस.पी.एम.कॉलेज जवळ ,दुगड चाळ,हांडेवाडी रोड, हडपसर, जिल्हा पुणे यास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 व भारतीय हत्यार कायदा क.४(२५) 37 ( 1)(3)सह135 अन्वये फिर्याद देवून त्यास पुढील कारवाई कामी
वानवडी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD
सदरची कारवाई
सहा.पो.निरीक्षक विवेक पाडवी,पोउनि गुंगा जगताप, पो.हवा.राजेश अभंगे,राजेश लोखंडे,विनायक रामाणे, शकिर खान, पो.ना. मनोज खरपुडे, पो.ना.गणेश लोखंडे, पो.ना.शिवाजी जाधव, पो.शि.अमोल सरतापे यांच्या पथकाने केली आहे.
मा. सादर व्हावे
(सुनील पंधरकर )
पोलीस निरीक्षक
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526