तडीपार गुन्हेगारास समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD

तडीपार गुन्हेगारास समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

PUNE CRIME NEWS दि . १०/०८/२०२१ रोजी समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगार तसेच तडीपार आरोपी चेक करणेकामी हद्दीत प्रट्रोलींग करीत असतांना तपास पथकातील पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना त्यांचे बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीतील तडीपार गुन्हेगार मटया हा निशांत टॉकीज समोर , भवानी पेठ , पुणे येथे सार्वजनिक रोडवर थांबला आहे . सदरची बातमी सहा . पोलीस निरीक्षक संदीप जोरे यांनी समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेसाठी आदेशीत केले . सदर व्या कामगिरीसाठी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी बातमीच्या ठिकाणी जावून सापळा लावून बातमी प्रमाणे खात्री करून तडीपार इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव चारता त्याने आपले नांव पत्ता सुशांत उर्फ मटया शशीकांत कुचेकर , वय २७ वर्षे , सध्या रा . अहमदनगर मुळ रा . ८४३ राजेवाडी , नानापेठ , पुणे असे असल्याचे सांगीतले . त्यास सदर ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता तो उडवाउडविची उत्तरे देवू लागला तसेच त्यास तडीपार काळात सदर ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता त्याने कोणाची परवानगी घेतली नसलेबाबत सांगीतले . सदर आरोपीने मा . पोलिस उप – आयुक्त सो , परिमंडळ -०१ , पुणे शहर यांचे कार्यालयीन तडिपार आदेश क्रमांक – ३८ / २०१९ अन्वये महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६ ( १ ) ( अ ) ( ब ) प्रमाणे दि . २० / १२ / २०१९ पासुन २ वर्षाकरीता पुणे शहर आयुक्तालय व पुणे जिल्हयातुन तडिपार केले असताना त्याने सदर तडिपार आदेशाचा भंग केलेने त्यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

सदरची कामगिरी ही मा . डॉ . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ पुणे शहर , मा . श्री . सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे श्री . विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक संदीप जोरे , पोलीस अंमलदार सुमित खुट्टे , विठ्ठल चोरमले , संतोष काळे , सुशील लोणकर , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , सुभाष मोरे , निलेश साबळे , सुनिल हासबे , नितीन घोसाळकर , श्याम सुर्यवंशी महेश जाधव, मपोना वनिता गोरे ,यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *