दर्शना पवार खून प्रकरणातील आरोपीं पुणे ग्रामीण पोलीसांच्या जाळ्यात.राहुल हंडोरिस पोलिसांचे समोर केली कबुली.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे ग्रामीण,दि.२२ :- (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
दि. १८/६/२०२३ रोजी वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावचे हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी एक बेवारस महिलेचा मृतदेह आढळुन आला होता सदर मृतदेहाचे शेजारी ओपो कंपनीचा मोबाईल फोन, काळे रंगाचा गॉगल तसेच काळया रंगाची बॅग व निळया रंगाचे जर्कीन अशा वस्तु मिळून आल्या होत्या. त्यावरून मृतदेहाची ओळख पटविली असता तो मृतदेह दर्शना दत्तू पवार वय २६ वर्षे रा राजशी शाहू बँक नन्हे पुणे हिचा असल्याची व ती दिनांक १२/०६/२०२३ रोजी १०/०० वा सिंहगड किल्ला फिरण्यास जाते असे सांगून निघुन गेली होती ती परत आली नव्हती त्यामुळे तिचे वडील श्री. दत्ता दिनकर पवार यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे दि. १५/०६/२०२३ रोजी मानव मिसींग खबर दिली असल्याचे निष्पन्न झाले मृतदे.
सदर गुन्हयाचे गांभीय पाहून पुणे ग्रामीण पोलीसचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल साो. व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे साो. यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा व वेल्हे पोलीसांची विशेष पथके तयार केलेली होती.दर्शना पवारच्या हत्या प्रकरणातील तीचा मित्र राहुल हंडोरेला मुंबईत अटक, खुनाचे धक्कादायक कारण समोर. दर्शना पवारचा मृतदेह वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावचे हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी आढळला होता. दि.१२ जून रोजी ती सिंहगड किल्ला वर फिरण्यास जाते असे सांगून राहुल हंडोरेसोबत फिरायला गेली होती. १८ जून रोजी गुंजवणे गावचे हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

व सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस तपास पथकास परिस्थितीजन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांकडून मिळालेल्या माहितीवरून सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे, वय २८ वर्षे, रा. कर्वेनगर, पुणे, मुळ रा. मु.पो. शहा, ता. सिन्नर, जि. नाशीक हा गुन्हयातील मुख्य संशयीत असल्याचे व तो गुन्हा घडल्यापासून पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध सुरू केला राहुल हंडोरे वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथके त्याचा शोध घेत होते. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला घेऊन अंधेरी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले आहे. एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शना पवार हिची वन अधिकारी पदी निवड झाली होती. त्यानिमित्त पुण्यात सत्कार समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर दर्शना बेपत्ता होती. तिच्या आई वडिलांनी पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

दि. ९ जून रोजी पुणे येथे वनविभागाचे परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाल्याबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी ४ वाजेपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र त्यानंतर तिने घरच्यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे दर्शनाचे घरचे घाबरले होते. घरच्यांनी पुणे येथे चौकशी केली असता ती तिचा मित्र राहुल हंडोरे याच्या बरोबर सिंहगड येथे फिरायला गेले असल्याचे समजले होते.
दरम्यान, दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर तिचा मित्र राहुल हांडोरे याचा शोध पोलीस घेत होते. दर्शनाच्या हत्या त्याने केल्याचा संशय आहे. राहुलचे अखेरचे लोकेशन कात्रजमध्ये दिसून आले होते. त्यानतंर दोन दिवसांनी दिल्लीत एटीएममधून पैसे काढल्याची माहिती समोर आली होती. तर रविवारी रात्री नातेवाईकाशी फोनवर बोलला होता. परराज्यातही त्याचे लोकेशन आढळले होते. अखेर त्याला अंधेरी रेल्वे स्टेशन तेथुन अटक केली. त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा गुन्हा करण्यामागील मुख्य हेतु तसेच गुन्हयाचा घटनाक्रम याबाबत तपास चालू आहे गुन्हयाचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, हवेली विभाग हे करीत आहेत.

सदर कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग भाऊसाहेब ढोले. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक. अविनाश शिळीमकर, स.पो.नि.श्री. राहुल गावडे, पो.स. ई.श्री. प्रदिप चौधरी, पो.हवा.रामदास बाबर, हेमंत विरोळे, राजू मोमीन, पो.ना. अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, मंगेश भगत, पो.कॉ. दगडु विरकर तसेच वेल्हे पो.स्टे. येथील स.पो.नि.श्री. मनोज पवार यांनी पो.हवा. योगेश जाधव, ज्ञानदीप धिवार, औदुंबर अडवाल, राहूल काळे, पो.ना. अजय शिंदे, पो.कॉ. आकाश पाटील, चा.पो.हवा. गणेश चंदनशिव, चा.पो.कॉ. ज्ञानेश्वर शेडगे, होमगार्ड विजय घोयने, विक्रांत गायकवाड व पोलीस मित्र संतोष पाटोळे यांची वेगवेगळी पथके तयार करून रवाना केलेली होती त्यांनी गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad