पोलीस आयुक्तांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या आरोपी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या जाळ्यात.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पोलीस आयुक्तांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या आरोपी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या जाळ्यात.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

पिंपरी चिंचवड,दि.२७ : पोलीस आयुक्तांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या आरोपी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुन्हा एकदा वेशांतर करून मोठी कारवाई केली आहे.

त्यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नावे सामान्य नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड परिसरात रोषल बागल नावाने वावरणारा एक तरुण स्वतःला कृष्ण प्रकाश आणि मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विश्वास नागरे पाटील यांचा मित्र असल्याचे सांगत सामान्य नागरिकांना धमकावत त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना गोपनीय माहिती मिळाली व कृष्ण प्रकाश यांनी वेष बदलून आयुक्त कृष्ण प्रकाश स्वतः आरोपी समोर बसले.

आपण काम करवून घेण्यासाठी आलो असल्याचं भासवत त्यांनी आरोपीला रोख रक्कमही दिली.मात्र आरोपीने पैसे स्वीकारताच कृष्ण प्रकाश आपल्या मूळ रूपात आले आणि त्यांनी आरोपी रोषलला रंगेहाथ पकडून जेरबंद केलं. महिलेने कस्टमर केअरला केला कॉल अन् खात्यातून तब्बल २ लाख ८० हजार गायब या घटनेबाबत बोलताना कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं की जमीन खरेदी प्रकरणी पोलीस आयुक्तांकडून बेकायदेशीर काम करून घेण्याचं सांगत आरोपीने दोन लाखांची रक्कम मागितली होती. मात्र समोर पोलीस आयुक्तच बसलते हे त्याला ओळखता आलं नाही. आरोपीने माझ्याकडून पैसे घेताच मी माझी ओळख सांगितली आणि त्याचे धाबे दणाणले.आरोपी रोषलच्या अटकेचा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

पोलीस आयुक्तांकडून बेकायदेशीररित्या काम करवून घेणार असल्याचं सांगत एका हॉटेलमध्ये बैठकीसाठी आलेला रोशल पोलीस आयुक्तांच्याच जाळ्यात अलगद अडकला. आधीही त्याने आपल्या घर मालकाला धमकी देत त्याच्याकडून खंडणी उकळल्याची माहिती तपासत समोर आली.त्याशिवाय रोषलकडे पोलिसाचं बनावट ओळखपत्रही पोलिसांना मिळालं.

आरोपी रोषलने एका व्यक्तिला अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे मागितले असल्याचं चित्रीकरणही पोलिसांनी जप्त केलं. त्याआधारे पिंपरी चिंचवड पोलीस आता पुढचा तपास करत आहेत. दरम्यान आधीही कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर केलं होतं, त्यावेळी त्यांनी आपल्याच खात्यातील कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी अशी अवस्था करत त्यांना शिस्त लावली होती.

मात्र, यावेळी त्यांनी वेष बदलून एका आरोपीला जेरबंद केलं. खरंतर सार्वजनिक ठिकाणी एखाद्या सराईत आरोपीला बोलवून त्याला रंगेहाथ जेरबंद करणं तशी जोखिमेची कामगिरी असते.

मात्र पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या धाडसामुळे आरोपी रोषल आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात आलेत.

त्यामुळे रोषलने आत्तापर्यंत किती जणांना फसवलं आणि सामन्यांची आर्थिक लूट करण्यासाठी कुणा-कुणाची नावं वापरली हे उघड करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे .

या कारवाईत स्वतः पोलीस कृष्ण प्रकाश, शस्त्रविरोधी पथकाचे प्रमुख राजेंद्र निकाळजे आणि गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने तसंच इतर कर्मचारी सामील होते.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *