Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

मुंढवा येथील ‘बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार’वर सामाजिक सुरक्षा विभागा ची.कारवाई. कारवाई करून साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर केला जप्त.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक २७/०२/२०२३ (ACS NEWS) सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकारी

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

मुंढवा येथील ‘बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार’वर सामाजिक सुरक्षा विभागा ची.कारवाई. कारवाई करून साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर केला जप्त.

रात्री १०/०० वा. नंतर मुंढवा परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अॅण्ड बारवर कारवाई करून साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर केला जप्त.

दि.२६.०१.२०२३ रोजी सामाजिक सुरक्षा विभागातल पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे मुंढवा परीसरात पेट्रोलिंग करीत असताना ताडीगुत्ता रोड, मुंढवा, पुणे येथे बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अॅण्ड बार मध्ये मोठया आवाजात साऊंड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.

ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. .न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत रात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मुंढवा येथील ‘बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट ॲण्ड बार’वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई रविवारी (दि.26) करण्यात आली असून या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, डीजे मिक्सर जप्त केले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकारी कर्मचारी रविवारी पेट्रोलींग असताना रात्री दहा वाजल्यानंतरही मुंढवा येथील ‘बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट ॲण्ड बार’ येथे मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याचे आढळून आले. पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता नियमांचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु होते. पोलिसांनी 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केले.सदर ठिकाणी ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे. .तसेच या हॉटेलच्या मालक आणि मॅनेजरवर पर्यावरण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदूषण अधिनियमांतर्गत मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, संदीप कोळगे व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *