अवैधरित्या स्पा सेंटरच्या नावाखाली पाच महिलांकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या वर कारवाई.
ACS POLICE CRIME SQUAD
अवैधरित्या स्पा सेंटरच्या नावाखाली पाच महिलांकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या वर कारवाई.
चिंचवड पोलीस (सामाजिक सुरक्षा विभाग) यांची कारवाई.
विशेष क्राइम प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरी चिंचवड पुणे दि: १८ सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक १७/१२/२०२१ रोजी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे अमिष दाखवून त्यांचेकडून स्पा सेंटरमध्ये जबरदस्तीने स्पा चे नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एक इसम व महिलेविरध्द कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक १७/१२/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत बालेवाडी – हिंजवडी रोड , भुजबळ चौक , वाकड , पुणे येथे The address commericia या मॉलमध्ये चौथ्या मजल्यावर Blossom saloon and spa सेंटरमध्ये स्पा सेंटरचा चालक-मालक इसम नामे सचिन सुरेश भिसे व महिला मॅनेजर हे दोघे संगनमताने स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतात.
अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सामाजिक सुरक्षा पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत स्पा सेंटरमध्ये डिकॉय कस्टमर पाठवुन वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्री होताच सापळा रचुन १५:२० वा चे सुमारास छापा टाकला असता असा प्रकार उघडकीस आला की , वेश्यागमनासाठी स्पा सेंटर चालक – मालक व महिला मॅनेजर हे प्रतिग्राहक ३०००/- रु घेतात व त्यातून महिलांना वेश्यागमनाचा मोबदला म्हणून प्रत्येकी ५०० / – रु देवुन स्पा चे नावाखाली वेश्याव्यवसाय चालवितात.
स्पा सेंटरमधुन स्पा चे नावाखालील वेश्याव्यवसाय करणाऱ्या
०१ परदेशी, ०१ कर्नाटक या पर राज्यातील व ०३ राज्यातील अशा एकुण ०५ पिडीत महिलांची वेश्याव्यवसायातुन सुटका करण्यात आली असुन त्यांना महिला सुधारगृह हडपसर , पुणे येथे ठेवण्यात आले आहे
आणि खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त केला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे .
१ ) १३,५०० / – रु रोख रक्कम
२ ) १७,००० / -रुकिं
३ ) २० / – रु किं चे इतर साहित्य . ०२ अॅण्ड्रॉईड मोबाईल जु.वा. किं . अं . असा एकुण ३०,५२० / – रु किं चा मुद्देमाल मिळुन आला आहे.
इसम नामे १ ) सचिन सुरेश भिसे वय ३३ वर्षे रा . मु . शिराढोण ता . तुळजापुर जि . उस्मानाबाद ( स्पा चालक – मालक ) तसेच पाहिजे आरोपी एक महिला ( स्पा सेंटर मॅनेजर ) यांचेविरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गुरनं १०६६/२०२१ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ भादंवि कलम ३७० ( ३ ) , ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहे .
सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश , मा . अप्पर पोलीस आयुक्त श्री . डॉ . संजय शिंदे , मा . पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) श्री . काकासाहेब डोळे , मा . सहा . पोलीस आयुक्त डॉ . श्री . प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री . देवेंद्र चव्हाण , सपोनि डॉ . अशोक डोंगरे , प्रदिपसिंग सिसोदे , पोउपनि धैर्यशिल सोळंके , पोलीस अंमलदार विजय कांबळे , किशोर पढेर , संतोष बर्गे , नितीन लोंढे , मारुती करचुंडे , गणेश कारोटे , भगवंता मुठे , जालिंदर गारे , सचिन गोनटे , संगिता जाधव , राजेश कोकाटे , अतुल लोखंडे , सोनाली माने , योगेश तिडके यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
ए.सी.एस पुलीस क्राईम स्कॉड.ऑनलाइन पोर्टल न्यूज