डेक्कन पोलीसांची कौतुकास्पद धडाकेबाज कामगिरी; कोरोना (कोविड-१९) चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करुन दोन आरोपींना केले अटक

डेक्कन पोलीसांची कौतुकास्पद धडाकेबाज कामगिरी; कोरोना (कोविड-१९) चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करुन दोन आरोपींना केले अटक
Apr 19, 2021

पुणे : पुण्यात शिवाजीनगर परिसरातील जिनपॅच डायग्नोस्टीक इंडीया लॅबच्या नावाने संपुर्ण जगात पसरलेला कोरोना (कोविड-१९) संसर्गजन्य विषाणू आजारांच्या चाचणीचा बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीसांनी पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक करून कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव पसरण्याचा मोठा अनर्थ टाळल्याची कौतुकास्पद धडाकेबाज कामगिरी केली आहे.

सागर अशोक हांडे (वय २५, रा.मोकाटे बिल्डींग, फ्लॅट नं.१९, ज्ञानेश्वर कॉलनी,संगम चौकाजवळ,पुणे. मुळगाव- द्रावणकोळा, ता.मुखेड, जि.नांदेड), दयानंद भिमराव खराटे (वय २१, रा.फ्लॅट नं.१०४, अमरवारस सोसायटी, गणपती माथा, वारजे माळवाडी, पुणे. मुळगाव- रा.भोगजी, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) असे डेक्कन पोलीसांनी अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत. तर त्यांना मदत करणार्या दोन आरोपी साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

डेक्कन पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मुरलीधर करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहरात शिवाजीनगर येथील जे.एम.रोड वरील जिनपॅच डायग्नोस्टीक इंडीया लॅबच्या नावाने कोणतरी Covid RTPCR चाचणीचा बनावट रिपोर्ट देत असल्या प्रकरणी जिनपॅच डायग्नोस्टीक इंडीयाचे अॅडमिन मॅनेजर रुपेश श्रीकांत नाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि.नंबर ४३/२०२१, भादंवि ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७१, ३३६ कलमान्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपींना अटकाव करण्याकामी तात्काळ डेक्कन पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मुरलीधर करपे यांनी तपास पथकातील पोलीसांना आदेशीत केले. त्याप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.बाळासाहेब मरेकर यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित कुदळे यांच्यासह पोलीस हवलदार इनामदार, पोलीस अंमलदार देवढे, शिंदे, पाटील, पानपाटील यांनी गुन्ह्याचा तांत्रीक विश्लेषनद्वारे आरोपी निष्पन्न करून आरोपीबाबत उपयुक्त माहिती प्राप्त करत दाखल गुन्ह्यातील आरोपी सागर अशोक हांडे (वय २५, रा.मोकाटे बिल्डींग, फ्लॅट नं.१९, ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौकाजवळ, पुणे. मुळगाव- द्रावणकोळा, ता.मुखेड, जि.नांदेड), दयानंद भिमराव खराटे (वय २१, रा.फ्लॅट नं.१०४, अमरवारस सोसायटी, गणपती माथा, वारजे माळवाडी, पुणे. मुळगाव- रा.भोगजी, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) यांना शिताफीने सापळा रचून अटक करून आरोपींची तपासकामी सखोल चौकशी केली असता आरोपींंनी त्याच्यां दोन साथीदारांच्या मदतीने अनेक लोकांचे Covid RT-PCR चाचणीचे बनावट रिपोर्ट बनवुन दिल्याची माहिती उघडकीस आणली आहे. डेक्कन पोलीस फरार आरोपी साथीदारांचा शोध घेत गुन्ह्याचा अधिकचा पुढील तपास करीत आहेत.

मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मुरलीधर करपे यांचे नागरिकांना आवाहन..
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मुरलीधर करपे यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, अशा प्रकारे कोणत्याही अनोळखी इसमांवर विश्वास ठेवुन कोरोना (कोविड-१९) चाचणी न करता मान्यता प्राप्त लॅबमधुनच चाचणी करुन खात्रीशीर रिपोर्ट घ्यावा व कोरोना (कोविड-१९) संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे दृष्टीने सर्वांनी योग्य दक्षता व काळजी घ्यावी.

सदरची कामगिरी ही,
मा.श्री.संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर,
मा.श्री.श्रीनिवास घाडगे पोलीस उपआयुक्त गुन्हे (अति कार्यभार परिमंडळ-०१) पुणे शहर,
मा.श्री.मालोजीराव पाटील सहा.पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर,
मा.श्री.मुरलीधर करपे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनूसार तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.बाबासाहेब झरेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री.अभिजित कुदळे, पोलीस हवालदार इनामदार, पोलीस अंमलदार देवढे, शिंदे, पाटील, पानपाटील यांनी केली आहे.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *