हडपसर पोलीस स्टेशन तपास पथकाची 1 * जिगरबाज कामगिरी मोक्यामध्ये फरारी असणा-या दोन अट्टल सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक*
हडपसर पोलीस स्टेशन तपास पथकाची 1 जिगरबाज कामगिरी
औंधमध्ये पोलीसांना धमकावून पळ काढणा-या व मोक्यामध्ये फरारी असणा-या दोन अट्टल सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करून त्याचेकडून हडपसर पो.ठाणे व इतर पोलीस ठाणेकडील घरफोडी चोरी , दुचाकी व चारचाकी गाडया चोरीचे एकुण १२ गुन्हे उघडकीस आणून त्यांचेकडून ४ चारचाकी , ४ मोटरसायकल , व सोने चांदीचे दागिने असा एकुण / – १८,१७,४ ९ ५ / – ( अठरा लाख रातरा हजार चारशे पंच्च्यात्रव रूपयेचा ) रु . किं . चा मुद्देमाल हस्तगत केला .
पुणे शहरातील वाहन चोरी, व घरफोडी चोरीच्या गुन्हयास प्रतिबंध करुन , चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी सपोनि हनुमंत गायकवाड व सौरभ माने व पोलीस अंमलदार हे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना दिनांक १३/०४/२०२१ रोजी १४/३५ वा . चे सुमारास तपास पथकाचे पोलीस नाईक समीर पांडूळे व पो.शि.प्रशांत टोनपे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं २८ ९ / २०२१ भादवि कलम ४५४ , ४५७ , ३८० ३४ मधील संशयित इसम नामे सनीसिंग पापासिंग दुधाणी वय २२ वर्षे रा . गल्ली नं ५ बिराजदार नगर श्री साई सोसायटी समोर हडपसर पुणे २ ) सोहेल जावेद शेख वय २१ वर्षे रा गोसावी वस्ती हनुमान मंदीरासमोर बिराजदार नगर हडपसर पुणे आणि बाल अपचारी हे बिराजदार नगर कॅनोलजवळ फिरत आहेत . मिळाले बातमीच्या अनुषंगाने वरील नमूद अंमलदार यांनी बातमीची शहानिशा करणेकरीता व आरोपींचा शोध घेणेकरीता बिराजदार नगर येथील कॅनॉलजवळ गेले असता तेथे संशयित इसम नामे सनीसिंग व त्यांचे वरील दोन साथीदार असे त्यांचेकडील लाल रंगाची मोटारसायकल अँक्टिव्हा क्रमांक एम.एच १२ पी.ई ३९५४ वरून जात असताना दिसले . त्यांना पोलीस अंमलदार यांनी ओळखून सन्या थांब असे म्हणून आवाज दिला असता ते त्यांचेकडील मोटारसायकल वरून पळून जात असताना त्यांचा दोन्ही अंमलदार यांनी पाठलाग करून पकडले . त्याचवेळी त्यांनी तपास पथकातील इतर पेट्रोलिंग करणारे अधिकारी व अंमलदार यांना सदरची माहिती दिलेनंतर उर्वरीत तपास पथकाचे अधिकारी व अमलदार हे त्या ठिकाणी पोहचलेनंतर त्यांना पोलीस ठाणे येथे आणलेनंतर त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी हडपसर पोलीस ठाणेकडील वरील नमूद गुन्हा केल्याची कबूली दिली . अटक मुदतीत आरोपीकडे सचोटीने व कौशल्यपुर्वक तपास केला असता , त्यांनी हडपसर , कोरेगाव पार्क , भोसरी , चाकण , कोंढवा या परीसरामध्ये घरफोडी / वाहनचोरी केल्याची कबूली देवून त्यांनी मेंमोरंडम पंचनाम्याव्दारे एकुण ०४ घरफोड्या , चारचाकी वाहने , ४ ( २ ईको , १ स्वीफ्ट , १ झेन ) 4 दुचाकी वाहने ( २ ऑक्टीया , १ डिओ , 1 होन्डा शाईन ) असे एकुण १२ गुन्हे केले असून त्यांचेकडून १८,१७,४ ९ ५ / – ( अठरा लाख सतरा हजार चारशे पंच्यान्नव रूपयेचा ) किंमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आलेला आहे .
वरील निष्पन्न गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहेत आरोपी 1) सनीसिंग पापासिंग दुधाणी यांचे वर पुणे शहर सोलापुर पुणे ग्रामीण या जिल्ह्यात एकुण 55 गुन्हे दाखल आहेत. 2) सोहेल जावेद शेख याचे वर 16 गुन्हे दाखल आहेत. 3) अमरसिंग टाक हा गुन्हा घडले पासून फरार आहे. त्याचा शोध घेणे चालू आहे. 4 था आरोपी विधिसंघर्षीत बालक आहे
सदरची कारवाई मा . नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे व मा.नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ मा.कल्याणराव विधाते सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे श्री बाळकृष्ण कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस ठाणे पुणे श्री राजू अडागळे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री दिंगबर शिंदे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे सुचना मार्गदर्शन प्रमाणे गुन्हे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक श्री सौरभ माने पो.हवा प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पो.ना. नितीन मुंडे , समीर पांडूळे , अविनाश गोसावी , पो.शि.अकबर शेख , प्रशांत टोनपे , शाहीद शेख , प्रशांत दुधाळ , निखिल पवार , शशिकांत नाळे , सचिन जाधव सैदोबा भोजराव , संदीप M , यांच्या पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे .