विमानतळ पोलीस स्टेशनची कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक -०४/०८/२०२१ विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर नेपाळ देशातील तरुणांचे टोळीकडुन घरफोडीचे ०२ गुन्हे उघड , विमानतळ पोलीस स्टेशनची कारवाई

ONLINE PORTAL NEWS

दत्ताराम देसाई हे स्कायवन कॉर्पोरेट पार्क , एअरपोर्ट रोड विमाननगर पुणे येथे स्टोअर मॅनेजर या पदावर नोकरी करीत असुन दिनांक १९ / ०७ / २०२१ ते दिनांक २०/०७/२०२१ या दरम्यान त्यांचे स्टोअरचा पत्रा उचकटुन स्टोअर मधील रु . ३,००,००० / – किमतीचे कॉपर पटटी व कॉपर आर्थिंग वायर चोरुन नेलेचे लक्षात आले नंतर त्यांनी विमानतळ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . नमुद गुन्हयाचा तपास तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री . सचिन जाधव यांचेकडे देण्यात आला होता . गुन्हयातील चोरी करणारे आरोपीतानी कोणत्याही प्रकारचा पुरावा मागे न ठेवता सदरची चोरी केल्याने गुन्हा उघडकीस येण्या मध्ये अडचणी निर्माण होत होत्या . तपासी अधिकारी व त्यांचे पथकाने कसोशिने तपास केला असता नमुद गुन्हा नेपाळ देशातील तरुणांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त केली असता सदरचा गुन्हा नेपाळ देशातील १. ) नयनसिंग खडखसिंग ढोली वय ४० वर्षे सुरकेत काठमांडु नेपाळ , २. ) गंगे मने दमय वय २४ वर्षे बारल्ला जि – मोगलसेन काठमांडु नेपाळ ३ ) भिम दिपक थापा वय १ ९ वर्षे रा . घाटागाव , जि- सुरकेत काठमांडु नेपाळ , ४ ) महेंद्र दिपक नेपाली वय १९ वर्षे घाटागाव , जि सुरकेत काठमांडु नेपाळ सध्या रा.नेहरु नगर निगडी पुणे यांनी केला असल्याची माहिती मिळताच त्यांना दिनांक २ ९ / ०७ / २०२१ रोजी अटक करुन त्यांचेकडे तपास करुन त्यांची पोलीस कोठडी घेऊन तपास केला असता त्यांनी नमुद गुन्हा केला असल्याची कबुली देवुन चोरलेला माल व गुन्हा करताना वापरलेला चारचाकी टेंपो असा सर्व मिळुन रु . ६,००,००० / – चा मुदेमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे . नमुद गुन्हयाचे तपासा दरम्यान त्याच आरोपीनी दिनांक ०५/०६/२०२१ रोजी मध्यरात्री निकोगार्डन काश्मिर चौक महाराष्ट्र बॅके समोर विमाननगर पुणे या ठिकाणा वरुन महिला नामे पुनम चौहान यांचे प्रापंचिक वस्तुचोरी केल्याची कबुली दिली असुन सदर वस्तु तपासा दरम्यान हस्तगत करण्यात आलेल्या आहेत . गुन्हा दाखल झाले नंतर गुन्हयाचे तपासा बाबत श्री . पंकजदेशमुख , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर , श्री . किशोर जाधव , सहा पोलीस आयुक्त , येरवडा विभाग पुणे , श्री . भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विमानतळ पोलीस स्टेशन , श्री . मंगेश जगताप , पोलीस निरीक्षक , गुन्हे , विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सचिन जाधव व त्यांचे पथकातील अविनाश शेवाळे , उमेश धेंडे , रमेश लोहकरे , मोहन काळे , विनोद महाजन , नाना कर्चे , विकास धावडे , गिरीष नानेकर यांनी कसोशिने तपास करुन नेपाळ देशातील तरुणांचे कडुन एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणले आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *