गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई
ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक -०४/०८/२०२१ दरोडा व वाहनचोरी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर मोका मधील पाहिजे आरोपीस केले जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रं १ , गुन्हे शाखा , पुणे शहर येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार १००१९ सुमित ताकपेरे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीच्या आधारे फरासखाना पो.स्टे . गु.र.नं. ११५/२०२१ भादवि कलम ३०७ , ३८४ , ३९५ , ३२३ , ५०४ , ५०६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ भारतीय हत्यार कायदा कलम ४ सह २५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का कायदा ) सन १९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) ३ ( २ ) ३ ( ४ ) मधील पाहिजे आरोपी नामे शहजाद कमरुद्दीन शेख , रा . ३१३ , गणेश पेठ , पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार असुन तो साई बाबानगर , नुरानी कबरीस्थान , कोंढवा , पुणे येथे येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर बातमीबाबत मा . वरिष्ठांना माहिती देवुन मा.वरिष्ठांचे परवानगीने आम्ही स्वतः तसेच सपोफौ शेख , पो.हवा . ८०९ शिवतरे , पो.ना. ३०४२ मेंगे , पो.ना. २८८ धनंजय ताजणे यांना बातमीची ठिकाणी रवाना करुन पाहिजे आरोपी मिळताच त्यास समक्ष हजर करणेबाबत आदेशित केले होते . प्राप्त बातमीचे अनुषंगाने वर नमुद केले पोलीस स्टाफ हे साई बाबानगर , नुरानी कबरीस्थान , कोंढवा , पुणे येथे जावुन मिळालेल्या माहितीप्रमाणे वरील पाहिजे आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव , पत्ता विचारता त्याने त्याचे नाव शहजाद कमरुद्दीन शेख , वय – २१ वर्षे , रा . ३१३ , गणेश पेठ , पुणे असे सांगितले . सदर पाहिजे आरोपीस वर नमुद केले पोलीस स्टाफ यांनी ताब्यात घेवुन पुढील चौकशीकामी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर चे कार्यालयात आणुन दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याचा दाखल गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाईकरीता मा.सहाय्यक पोलीस आयुक्त साो , फरासखाना विभाग , पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे .
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह – आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , श्री.अशोक मोराळे गुन्हे शाखा पुणे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.सुरेंद्रकुमार देशमुख , गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा , चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे , सपोनि जुबेर मुजावर , सहा पोलीस फौजदार शाहिद शेख , पोलीस हवालदार निलेश शिवतरे , पोलीस नाईक अतुल मेंगे , धनंजय ताजणे , प्रमोद मोहिते , गणेश ढगे व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे , दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CRIME REPORTER RAEES KHAN
9881888008