Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

महिलेचे अपहरण करून गुजरातला विकण्याचा प्रयत्न,पुण्यात खळबळ ! येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पशुखाद्य आणण्यासाठी गेलेल्या महिलेचे विमानतळ रस्त्यावरील संजय पार्क येथून अपहरण करून तिला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तिला डांबून ठेवत गुजरातच्या गोध्रा येथे नेऊन विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेत तिथून पळ काढला आणि पोलिसांच्या मदतीने पुणे गाठले. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना ५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.

पुणे : (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,

पोलिसांनी कमला नावाच्या महिलेसह पाच अज्ञात आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डमध्ये राहण्यास आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ५ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता टिंगरे नगर येथे पशुखाद्य आणण्यासाठी गेलेली होती. पशुखाद्य घेऊन दुचाकीवरून ती जेलरोड चौकीकडे जाणाऱ्या विमानतळ रस्त्यावर असलेल्या संजय पार्क जवळून येत होती. त्यावेळी संजय पार्क मधून एक रिक्षा भरधाव वेगात त्यांच्या समोर आली आणि त्यांच्या दुचाकीला एका बाजूला दाबले. त्यानंतर या महिलेने दुचाकी थांबवताच एक रिक्षा चालक खाली उतरला.  त्याचवेळी पांढऱ्या रंगाची एक कार त्यांच्या बाजूला येऊन थांबली. त्यामधून दोन लोक उतरले. त्यांनी फिर्यादी महिलेला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवले आणि तोंडाला रुमाल बांधून तिथून पसार झाले..

त्यानंतर आरोपींनी या महिलेला कसले तरी इंजेक्शन दिले. त्यांना एक दिवस एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आले. तेथे असलेल्या कमलाबाई नावाच्या महिलेने ‘तेरे को भी ऐसाच रहना होगा, दुसरी जग तेरा सौदा करने वाले है’ असे तिला म्हणत आरोपींना ‘इसको संभाल के ले जाना’ असे सांगितले.आरोपींनी तिचे हातपाय बांधून दुसऱ्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये बसवले आणि आरोपी फिर्यादीला गाडीमध्ये घेऊन गेले. दरम्यान, पुण्यात ही महिला हरवल्याची तक्रार देण्यात आली.

महिलेला घेऊन जाणारी गाडी महामार्गाला लागल्यानंतर या महिलेने लघुशंकेला जायचे असल्याचे आरोपींना सांगितले. त्यावेळी आरोपींनी त्यांचे बांधलेले पाय सोडले. लघुशंकेच्या भावनेने खाली उतरलेली ही महिला जवळच असलेल्या जंगलामध्ये पळाली आणि लपून बसली. आरोपींनी बराच वेळ त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे आरोपी निघून गेले. पीडित महिला काही वेळाने रस्त्यावर आली आणि स्थानिक लोकांना तिने आपल्या सोबत घडलेला प्रसंग सांगितला. स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना फोन केला. त्यावेळी ही महिला गुजरात मधील गोध्रा येथे असल्याचे तिला समजले. स्थानिक पोलिसांनी तिला रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतर ती पोलिसांच्या मदतीने पुण्यामध्ये आली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो विमानतळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज वारंगुळे करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *