साहेब ! पोलिसांसाठी कोरोना नाही का?
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
एंटी करप्शन पथक एनजीओ के.
वाजिद खान संस्थापक मुख्यामंत्री को निवेदना दिया है
ACS POLICE CRIME SQUAD ON LINE POTEL
१२ तास कर्तव्य करून ठरलेल्या वेळेवर रेल्वेने ठाणे व पालघर व मुंबईतील राहते घर गाठायचे. या सर्वासाठी दिवसातील २४ तासांपैकी १५ ते १६ तास पोलीस सतत कार्यरत असतात. उरलेल्या तासांमध्ये घरी गेल्यावर स्वत:ला सॅनिटायझर करायचे. त्यानंतर इतर गोष्टी करायच्या अन् पुन्हा दुसºया दिवशी कर्तव्यासाठी ३ ते ४ तास आधीच घराबाहेर पडायचे. कर्तव्याचे हे १२ तास नक्कीच पोलिसांच्या जिवावर बेतणार, हे नाकारता येणार नाही.
साहेब, पोलिसांसाठी कोरोना नाही का? आजच्या घडीला डॉक्टरांचा सल्ला आहे की पुरेशी आराम व आहार कोरोनाच्या संकटात गरजेचे आहे. मग पोलिसांना हा नियम लागू होत नाही का? मुंबई पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग येण्यापूर्वी नियोजित ८ तास कर्तव्य सुरू होते. कोरोनावर आल्यावरही हे नियोजन योग्यरीत्या कसे करता येईल, यावर विचार विनिमय झाल्यास पोलिसांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ नक्कीच थांबवता येईल. पोलिसांनाही कुटुंब आहे, हे नाकारून चालणार नाही.
कोरोना (कोविड-१९)या संसर्गजन्य रोगाने संपूर्ण जगावर संकट आणले. सुरुवातीला कोरोनाबाबत फारसे संशोधन नसल्याने अनेक अफवा पसरत होत्या. मात्र आजच्या घडीला शालेय विद्यार्थ्यांनाही कोरोना किती घातक आहे?, कोरोनाचे दुष्परिणाम काय आहेत? आणि त्याच्यापासून स्वत:चा बचाव कसा करायचा हे चांगल्या प्रकारे माहीत झाले आहे. असे असताना मुंबई पोलीस दलात पोलिसांना कर्तव्याचे १२ तास करून त्यांच्या जिवाशी खेळ का सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाचे संकट राज्यात आले आणि लॉकडाऊनची भूमिका महत्त्वाची ठरली. कोरोनाचा प्रादुर्भाव बºयापैकी टाळता आला.
मात्र आता दुसºया लाटेत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या संकटात कर्तव्य बजावताना पोलिसांना होणारी लागण व पोलिसांमध्ये मृत्यूची लागलेली रांग पाहता ५५ वर्ष व ५० वर्षांवरील आजारांनी त्रस्त असलेल्या पोलिसांना तात्काळ घरी राहण्याचा आदेश देण्यात आला. परिणामी पोलिसांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो पोलीस कुटुंबांमध्ये संकट काळातही आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबत नव्हता. कोरोना संकटात कर्तव्य बजावताना युवा पोलीस अधिकारी, अंमलदार शहीद झाले.
कोरोना संकटात वेळेवर परिपूर्ण जेवण, कमीत कमी ७ तास झोप आणि सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतल्यास कोरोनापासून बचाव करता येऊ शकतो, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह तज्ज्ञ मंडळी वारंवार सांगत आहेत. शासनकर्त्यांचे व तज्ज्ञांचे म्हणणे बहुदा मुुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना पटत नसावे म्हणून पोलिसांना १२ तासांचे कर्तव्य करण्यास सांगितले जात आहे.
पोलिसांना होणारी कोरोनाची लागण पाहता १२/२४ तासांचे कर्तव्याची संकल्पना राबवण्यात आली. त्यामुळे पोलीस १२ तास कर्तव्य बजावत होते तर २४ तास आराम करायचे. या संकल्पनेमुळे पोलिसांचे आरोग्य चांगले राहण्यास व मनोबल वाढण्यास मोलाचे सहकार्य लाभले. एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी होती की, सालाबादप्रमाणे या वर्षी गणेशोत्सवाची धामधूम नव्हती. हजारो वर्षांच्या परंपरा, पूजाविधी कोरोनामुळे मोडल्या गेल्या. लोकहित जपून शेकडो गणेशोत्सव मंडळांनी १०-११ दिवसांचा गणेशोत्सव केवळ दीड दिवसांपुरता भक्तिभावात साजारा केला.
त्यातही कोरोनाबाबत शासनाने सांगितलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. त्याहून कौतुकास्पद म्हणजे अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही. यामागे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, हा लोकहितकारक निर्णय होता.
या सर्व परिस्थितीचा आढावा घेता कोरोना संकटात आलेल्या इतर शासकीय आस्थापणेतील कर्मचाºयांना वर्क फॉर्म होम करण्याची मुभा दिली आहे. पोलिसांना तसे जमणार नाही, याची पुरेपूर कल्पना आहे. मात्र कामाच्या तासामध्ये मुभा देता येऊ शकते. कोरोनाच्या दुसºया लाटेच्या नावाखाली पुन्हा बंदोबस्त! पुन्हा १२ तासांचे कर्तव्य! हे बुद्धीला पटत नाही. क्षमतेपेक्षा जास्त कर्तव्याच्या तासांमुळे पोलिसांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण होणे स्वाभाविक आहे, हे नाकारून चालणार नाही.
अजूनही वेळ गेलेली नाही. पोलिसांचेही कुटुंब आहे. कर्तव्य बजावणारा पोलीस कुटुंबामध्ये प्रत्येक नात्याशी जोडलेला आहे. कोणाचा पिता पोलीस तर कोणाची माता पोलीस आहे! कोणाचा पती पोलीस तर कोणाची पत्नी पोलीस! कोणाचा भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी पोलीस…. अशा नात्यांशी पोलीस कुटुंबीयांशी जोडलेला आहे.या पोलिसांच्या बाबतीत बरेवाईट झाले तर या नात्यांचे काय?
हा विचारच हादरून टाकतो. दुसरी लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे, हे मान्य पण प्रत्येक अडचणींवर तोडगा काढता येतो. त्यामुळे पोलिसांचे ८ तासांचे कर्तव्य केल्यास पोलिसांना पुरेसा आराम मिळू शकेल. कोरोना संकट काळात त्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येईल.
८ तास कर्तव्यामुळे पोलीस बांधव / भगिणी यांचे मनोबल वाढवले तर कमी मनुष्यबळातही उत्तमरीत्या कर्तव्य बजावले जाऊ शकते, हे कर्तव्य दक्ष मुंबई पोलीस दलाने यापूर्वीही दाखवून दिले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अर्थात पोलीस कुटुंब प्रमुख या नात्याने आपण यावर जरूर विचार करावा. शेवटी आपल्या एका निर्णयाने पोलीसच नव्हे तर पोलीस कुटुंंबीयही तणावमुक्त राहतील.
ACS POLICE CRIME SQUAD ON LINE POTEL NEWS
अँटी करप्शन स्क्वॉड एनजीओ
वाजिद खान
संस्थापक ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
एंटी करप्शन पथक एनजीओ के.
वाजिद खान संस्थापक मुख्यामंत्री को निवेदना दिया है.
Check out ANTI CORRUPTION SQUAD NGO on Google!
https://g.page/anti-corruption-squad?ad
Check out ANTI CORRUPTION SQUAD NGO on Google!
https://g.page/anti-corruption-squad?ad