दारूच्या व्यसनासाठी वाहनचोरी करणारे सराईत वाहनचोरांना अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कामगिरी

दारूच्या व्यसनासाठी वाहनचोरी करणारे सराईत वाहनचोरांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ यांचेकडून अटक.

पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार शिवाजी जाधव आणि उदय काळभोर यांनी आरोपीला केली अटक.

पुणे शहरामध्ये वाहनचोरीचे प्रमाण वाढत असल्याने मा.पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे व सहा.पो.आयुक्त श्री नारायण शिरगावकर यांनी रेकॉर्डवरील वाहनचोरांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वाहनचोरी व दरोडा विरोधी पथक- २ कडील अधिकारी व स्टाफ हे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दि.१७/०३/२०२२ रोजी पोलिस अंमलदार शिवाजी जाधव आणि उदय काळभोर यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, लोहिया गार्डन ,हडपसर गावठाण येथे विना नंबरच्या संशयित बुलेटसह दोन इसम हे थांबले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी सदर परिसरात जाऊन सापळा लावून शिताफीने संशयित बुलेटसह दोघांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे

१) प्रतिक राजेंद्र धरणे वय ३५ रा.पंचवटी, नाशिक.

२)अक्षय गणपती अंकुशे रा.काॅईल नगर, लातूर अशी असल्याचे सांगितले.त्यांना पुढील कारवाई करता दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कार्यालयात आणले असता त्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे अधिक तपास केला असता खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत .
१)हडपसर पो.स्टे.गुरनं २५४/ २०२२ भादवि कलम ३७९
२) यवत पोस्टे गुरनं २१३/ २०२२भादवि कलम ३७९
३) वळसंग पोस्टे सोलापूर गुरनं ५१३/२०२१ भादवि कलम ३७९
४)हिरोहोन्डा स्प्लेंडर+ :-तपास चालू आहे असा

एकूण १,८०,०००-/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदरील गुन्हे हे त्यांनी त्यांचा विधिसंर्षित साथीदार नामे अभिषेक अंकुश आंबेकर रा.हडपसर भाजी मंडई, पुणे याचेसह केलेले आहे
यातील आरोपी क्र. १) प्रतिक राजेंद्र धरणे आणि क्र. २)अक्षय गणपती अंकुशे यांचेवर खून, मारामारी, वाहनचोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. नारायण शिरगावकर , पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश लोखंडे, राजेश अभंगे,शाकिर खान, विनायक रामाने, सुदेश सपकाळ,शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, मुकुंद पवार यांचे पथकाने केली आहे.

 ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *