आंगठी खरेदी चा बाहणा सोन्याचे दुकानात चोरी.

दिनांक १५/०३/२०२२ सोन्याचे दुकानात आंगठी खरेदी करण्याचा बाहणा करुन सोनाराची नजर चुकवुन आंगठी घेवून चोरी दुचाकीवरुन पळुन गेलेल्या दोन चोरटया मुलींना सहकारनगर पोलीसांकडुन शिताफीने अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

बातमी अशी आहे की सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दित बालाजी नगर पुणे भागात इसम नामे आनंद हरीलाल पारख वय ४७ वर्षे धंदा व्यापार रा . सर्व्हे नं .६७८ गणेश गार्डन सोसायटी डी / १६ तीसरा मजला भगली हॉस्पीटल जवळ बिबवेवाडी पुणे यांचे पारख ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दागीने खरेदी विक्रीचे दुकान आहे .

दि .१०/०३/२०२२ रोजी सदर दुकानात जावुन दोन मुलीनी आंगठी खरेदी करण्याचा बाहणा करुन फिर्यादी नामे श्री आनंद पारख यांची नजर चुकवुन आंगठी घेवुन पळुन गेल्या होत्या .

सदरबाबत स.नगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं .५३ / २०२२ भा.द.वी. कलम ३७९ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे . दाखल गुन्हयाचा तपास मा .वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई स.नगर पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी बापु खेंगरे व तपास पथकाचे पोलीस अंमलदार करीत होते . दाखल गुन्हाचे अनुषंगाने घटनास्थळ व आजुबाजुचे परिसरातील ७० ते ७५ सि.सि.टी. व्हि . फुटेज चेक करुन माहिती घेत असताना फिर्यादी यांचे दुकानातुन आंगठी चोरुन पळुन जाणा – या मुली एका अॅक्टिवा गाडीवरुन एलोरा पॅलेस कडुन पुणे सातारा रोडने कात्रजकडे जाताना दिसल्या व त्यामध्ये गाडीचा अस्पष्ट नंबर व मॉडेल मिळुन आले . गाडीचे मॉडेल व नंबरवरून पुढील तपास करीत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक व प्रदिप बेडीस्कर यांना सदर गाडीचा आरटीओ नंबर एमएच १२ क्युव्हि ०३६८ असल्याचा व ती गाडी स.नं. १६ आंबेगाव पठार भागातील नारायणीनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली .

त्यानुसार तपास पथकातील स्टाफने मिळून सदर भागात सापळा लावुन शोध घेता सदरची गाडी व सि.सि. टी . व्ही . फुटेज मधील वर्णनाच्या दोन मुली सर्व्हे नं .१६ येथील शिवाजी अपार्टमेंटचे खाली गप्पा मारत असताना मिळुन आल्या . त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे

१ ) तेजल दयानंद मुनेश्वर , वय २० वर्षे धंदा शिक्षण रा.स.नं. १६ शिवनेरी हाईट्स फ्लॅट नं .३०३ तळमजला आंबेगाव पठार पुणे

२ ) सुमेधा उल्हास मुनेश्वर वय २१ वर्षे धंदा शिक्षण रा.स.नं .१६ शिवाजी अपार्टमेंट दुसरा मजला आंबेगाव पठार पुणे

अशी असल्याची सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्यांचेकडील दुचाकी हि स्वारगेट पोलीस स्टेशनचे हद्दितील हिराबाग येथुन चोरल्याची माहिती दिली . दोन्ही मुलींना सहकारनगर पोलीस स्टेशन कडील गुन्हयात अटक केली आहे . दोन्ही मुलींकडुन एकुण ४५,००० / – रुपये किमतीची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची आंगठी व २०,००० / – रुपये किमतीची दुचाकी असा एकुण ६५,००० / – रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे .

वरील मुलींकडुन खालील प्रमाणे ०२ गुन्हे उघडकीस आले आहेत .

१ ) सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं .५३ / २०२२ भा.द.वी. कलम ३७९ .३४ २ ) स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं .४६ / २०२२ भा.द.वी. कलम ३७९

सदरची कामगीरी पोलीस उपायुक्त परिमंडळ – २ श्री . सागर पाटील , सहा . पोलीस आयुक्त , स्वारगेट विभाग सुषमा चव्हाण मॅडम , वपोनिरी श्रीमती स्वाती देसाई यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी बापु खेंगरे पोलीस अंमलदार बापु खुटवड , महादेव नाळे , भुजंग इंगळे , सागर सुतकर , महेश मंडलिक , प्रदिप बेडीस्कर म.पो. अंमलदार रेखा यादव यांनी केली आहे .

( स्वाती देसाई ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *