कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील मॅनेजरला मारहाण करुन त्यांची पैशांची बॅग लुटण्याचा प्रयत्न करणारे तीन चालक भारती विद्यापीठ पोलीसांचे ताब्यात,,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कात्रज (पुणे): पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. अशातच आता कात्रज-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपावरील कामगाराला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.चोरट्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये कामगार जखमी झाला आहे.

कात्रज कोढवा रोडवरील एम.के.एन्टरप्रायझेस इंडीयन पेट्रोल पंपावरील दिवसभराची जमा झालेली ३,४६,०००/- रुपये रोख रक्कम ही बँकेत भरण्यासाठी पायी जात असताना अनोळखीन तीन मुलांनी त्यांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण व दुखापत करुन त्यांची बॅग जबरदस्तीने हिस्कावण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ३७/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९(५), ३०९ (६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी महिलने शेख यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी शेख यांनी हातातील ग्लासने आरोपी महिलेला मारले.

याबाबत सलीम सिकंदर शेख (वय ३१, रा.भैरवनाथ मंदिरासमोर, खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी दांडक्याने मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख एका पेट्रोल पंपावर कामाला आहेत. सोमवारी (१३ जानेवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ते पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी निघाले होते. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर परिसरात तीन चोरट्यांनी त्यंना अडवले. लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. डोक्यात दांडके बसल्याने ते जखमी झाले. झटापटीत चोरट्यांनी शेख यांच्याकडील रोकड ठेवलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी प्रसंगावधान राखून पिशवी घट्ट पकडली. त्यांचा आरडाओरडा ऐकून नागरिक तेथे जमा झाले. नागरिक जमा झाल्याचे पाहताच चोरटे पसार झाले.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सारे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

👨✈️🚔🚔👨✈️
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
.