स्वारगेट पोलीसांची धडाकेबाज कामगिरी प्राणघातक शस्त्रांसह माने टोळीला नऊ आरोपीला अटक करुन मोक्का अंतर्गत कारवाई.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ऑनलाईन पुणे :-१४/(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

स्वारगेट पोलीसांची धडाकेबाज कामगिरी प्राणघातक शस्त्रांसह माने टोळीला अटक करुन मोक्का अंतर्गत कारवाई.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील मिनाताई ठाकरे वसाहतीमधील भाईगिरीच्या वर्चस्व वादातून सचिन माने त्याच्या टोकीमधील १० ते १५ गुडांनी हतात कोयते, कु-हाडी, पालगण सारखी घातक हत्यारी दिनांक २६/०२/२०२३ रोजी सायंकाळी ७.३० या ते १०.३० च्या दरम्यान प्रतिस्पर्धी टोळीमधील प्रकाश पवार आणि त्याच्या ०४ ते ०५ साथीदारांवर प्राणघातक हल्ला करून जबर जखमी केले.. इकडे कसडा विधानसभा मतदानाच्या बंदोबस्तात रात्रदिवस तैनात असलेल्या स्वारगेट पोलीसांना खबर लागताच तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ पाय घेवुन झोपडपटटी परिसरात घुसुन गुन्हेगारावर झडप टाकून हत्यार सहित] ०४ ते ०५ जणांना पकडले परंतु अतिशय चालख व अटल गुन्हेगार टोळी प्रमुख सचिन माने व इत्तर साथीदार अधाराचा फायदा घेवून पळून गेले. सदर ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये पडलेल्या प्रकाश पवार य त्याच्या इतर मित्रांना लागलीच ससून हॉस्पीटलमध्ये वेळीच दाखल केले अन्यथा खुप मोठा अनर्थ ओढवला असता त्यानंतर सदर टोळीयर गु.र.नं. ६१ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२४ ३२६, १४३, १४७, १४८, १४९. ४२७ १०८, ५०६ भारतीय हत्यार का. क. ४ (२५) महा.पो.अधि. ३७ (१) सह १३५. १४२ फिलॉ अॅक्ट क. ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

सराईत गुन्हेगार सचिन माने (एस / एम कंपनी) स्वारगेट, सहकारनगर, मार्केटयार्ड परिसरामध्ये घातक शस्त्रासह दरोडे, खून, खुनाचे प्रयत्न, जबरी चोऱ्या, खंडणी सारखे गुन्हे केले असून त्याचेवर एकुण १५ गंभीर गुन्हयाची नोंद आहे. त्यानंतर सदर आरोपीस एक वर्षाकरीता येरवडा कारागृह येथे स्थानबद्ध केले होते परंतु सदर कारवाई करुनही त्याच्या मध्ये काहीएक सुधारणा झाली नाही. त्याने पुन्हा टोळी जमवुन वरील प्रमाणे गुन्हा करुन तो त्याच्या साथीदारसह फरार झाला होता. स्वारगेट पोलीस ठाणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार मुकुंद तारू पोलीस अमलदार शिवा गायकवाड, अनिस शेख,दिपक खेदाड, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे, संदीप घुले यांनी दिवसरात्र सदर गुन्हेगारांच्या अड्यांवर बॉच ठेवुन आरोपी निखील पेठकर व त्याच्या इतर ०२ ते ०३ साथीदारांना सिताफीने पाठलाग करुन घातक हत्यारासह पकडुन त्यांना अटक केली आहे.

दाखल गुन्हयातील टोळी प्रमुख सराईत गुन्हेगार सचिन माने हा वारंवार गुंगारा देत असुन तो त्याची मैत्रिणीला भेटणेकामी घोरपडी पेठ येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी वर नमुद तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांना पाळत ठेवून पहाटे ०२ वाजण्याच्या सुमारास टोळी प्रमुख आरोपी सचिन माने स्वताची ओळख लपवुन सदर ठिकाणी आल्याचे दिसल्याने त्याच्यावर झडप घालून त्याच्य कमरेला असलेला कोयता शिताफीने काढत असताना पोलीस अंमलदार शिवा गायकवाड व आरोपी सचिन माने यांच्यामध्ये झटापट झाल्याने पोलीस अमलदार शिवा गायकवाड किरकोळ जखमी झाले परंतु त्यास शिवा गायकवाड यांनी जागीच पकडुन ठेवले त्यानंतर वरिल स्टाफच्या मदतीने त्यास जेरबंद करून पोलीस ठाणे येथे आणले.

दाखल गुन्हयात पोलीस आयुक्त सो रितेश कुमार यांच्या आदेशाने मा. अप्पर पोलीस आयुक्त सो.. पश्चिम प्रादेशिक विभाग मा. पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ ०२ मा सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या मार्गदर्शनखाली मोक्का कायदयाअंतर्गत (१) सचिन परशूराम माने वय-२४ रा. ४२५/२६ औदयोगीक गुलटेकडी, पुणे (२) विजय प्रमोद डिखळे वय २२ वर्षे रा. समाज मंदिराजवळ स.नं ४२५/२६ औद्योगिक वसाहत, गुलटेकडी, पुणे (३) अमर तानाजी जाधव वय-३२ रा. ४२५/२६ औदयोगिक वसाहत गुलटेकडी, पुणे (४) रमेश दशरथ मेडम वय-२० रा. औद्योगीक वसाहत, गुलटेकडी, पुणे (५) अजय प्रमोद डिखळे वय २४ रा. संत नामदेव शाळे जवळ, औद्योगीक वसाहत, गुलटेकडी, पुणे (६) रोहीत मधुकर जाधव वय-२७ रा ४२५/२६ गल्ली नं.१४ मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे (७) यश किसन माने वय- 29 वर्षे रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे (८) मोन्या ऊर्फ सुरज सतिष काकडे वय २६ रा. संतनामदेव शाळेजवळ, महर्षीनगर, औदयोगिक वसाहत, पुणे (२) निखील राकेश पेटकर वय २२ वर्षे रा. आईमाता मंदिर, बिबवेवाडी, पुणे (१०) एक विधीसंघर्षित बालक (११) पल्या पासंगे वय २१ वर्षे रा. गुलटेकडी, पुणे (१२) माया उर्फ अभि उर्फ अभिषेक पाटोळे वय २२ वर्षे रा. जनता वसाहत, पर्वती, पुणे (१३) प्रमोद उर्फ पम्या रा. जनता वसाहत, पर्वती, पुणे (१४) आयुष किसन माने वय २१ वर्ष रा. गुलटेकडी, पुणे यांचेवर कारवाई करण्यात आली असुन यातील अनुक्रमे ०१ ते ०९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. .

तसेच आज रोजी सर्व अटक आरोपीतांना मोक्का गुन्हयात त्यांचे घरझडती करणेकामी त्यांचे राहते परिसरामध्ये योग्य बंदोबस्तामध्ये घेवुन जावुन घरझडती करण्यात आली आहे. सदर जेरबंद केलेल्या गुन्हेगारी टोळीस पाहुन परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सुनिल पवार सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा-१ अतिरीक्त कार्यभार स्वारगेट विभाग, पुणे हे करीत आहेत..

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीसउप आयुक्त परि २ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, अति, कार्यभार स्वारगेट विभाग, पुणे सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली अशोक इंदलकर व.पो. निरी. सोमनाथ जाधव पो. निरी. गुन्हे स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे तसेच सहा. पो. निरी. प्रशांत संदे पो.उप निरी. अशोक येवले, तपास पथकातील पोलीस हवालदार मुकुंद तारु पोलीस अंमलदार शिवा गायकवाड, अनिस शेख, दिपक खेदाड, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे, संदीप घुले सर्व स्वारगेट पोलीस ठाणे यांचे पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *