Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

लाच मागणारा खाजगी व्यक्ती ए सी बी परभणी पोलीसांच्या जाळ्यात.apcs.news


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

रिसोड खरेदी केलेल्या प्लॉटचा -फेरफार करुन सातबाराला लावण्याकरीता सात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका खाजगी व्यक्तीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ११ ऑक्टोंबर रोजी ताब्यात घेतले.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

थोडक्यात हकिकत

यातील तक्रारदार यांनी परभणी शहर महापालिका हद्दीतील खानापूर सर्वे मध्ये खरेदी केलेल्या प्लॉटचा फेरफार करून सातबाराला नोंद घेण्यासाठी आरोपी (खाजगी इसम) याने तलाठी यांच्याकडून काम करून घेतो असे म्हणून तक्रारदार यांना प्रथम १५,०००/- रू लाच मागणी केली. सदर रक्कम ही लाच असल्याने ती तक्रारदार यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक ११/१०/२०२३ रोजी ए सी बी परभणी कार्यालयात रितसर तक्रार दिली.



यातील तक्रारदार यांनी परभणी शहर महापालिका हद्दीतील खानापूर सर्वे मध्ये खरेदी केलेल्या प्लॉटचा फेरफार करून सातबाराला नोंद घेण्यासाठी आरोपी (खाजगी इसम) याने तलाठी यांच्याकडून काम करून घेतो असे म्हणून तक्रारदार यांना प्रथम १५,०००/- रू लाच मागणी केली.


त्यावरून दिनांक ११/१०/२०२३ रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी (खाजगी इसम) याने तक्रारदार यांना सांगितले की तुमचे फेरफारचे कामासाठी १५,०००/- रू लागतील. त्यावरून तक्रारदार यांनी एवढे पैसे कशासाठी लागतात असे विचारले असता, महानगरपालिका मध्ये तुमचे प्लॉटचे नियमितीकरण झालेले नाही. तलाठी माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्याकडून मी तुमचे सातबाराचे काम करून घेतो असे सांगितले.तक्रारदार यांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शिविल्यावरून तडजोडीअंती आरोपी(खाजगी इसम) यांनी परंतु, तडजोडी अंती सात हजार रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. परंतु, संबंधिताने या प्रकाराविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. आज दिनांक ११ ऑक्टोंबर आरोपी(खाजगी इसम) हर्षवर्धन सूर्यवंशी यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन नवामोंढा, परभणी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .

पो.नि श्री.बसवेश्वर जकिकोरे, पोह/चंद्रशेखर निलपत्रेवार , पोशि/अतुल कदम, मो. जिब्राईल शेख, शेख मुक्तार, चापोह कदम, अँटी करप्शन ब्युरो, युनिट परभणी,

परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा . १६०४

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *