शिवाजीनगर पोलीस स्टेशनची सायबर सेलची धडाकेबाज कामगिरी.मोबईल फोन विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यात आला.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची सायबर सेलची धडाकेबाज कामगिरी,.दिनांक ०७/०२/२०२३

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

२,५०,०००/- रुपये किंचे हरवलेले १५ मोबईल फोन विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यात शिवाजीनगर पो स्टे चे सायबर पथकास यश.

मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. संदीप कर्णिक सह पोलीस आयुक्त यांचे संकल्पनेतुन पुणेकरांच्या सायबर तक्रारी संदर्भात योग्य ती दखल घेण्याकरीता प्रत्येक पोलीस ठाणेस सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर कक्षाचे सपोनि बाजीराव नाईक, पोलीस शिपाई आदेश चलवादी, मपोशि रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबइलचा डेटा तयार करून, त्याबाबत तांत्रिक तपास करुन / त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन हे केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्याशी तसेच संबंधीत पोलीस ठाणेस कन्नड, तेलगु, हिंदी व मराठी अशा विविध भाषामध्ये संवाद साधून हरवलेले एकुण २.५० लाख रु. कि.चे १५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधीत तक्रारदार यांना परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.

मोबाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलीसांचे वेबसाईटला तसेच शासनाचे Central Equipment Identity Register ( CEIR ) या पोर्टलवर नोंद करावी असे आवाहन पुणे पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विक्रम गौड, सहा. पो. निरी. बाजीराव नाईक, भोलेनाथ अहीवळे, पोलीस अंमलदार, अविनाश भिवरे, बशीर सय्यद, रुपेश वाघमारे, रणजित फडतरे, गणपत वालकोळी, आदेश चलवादी, महिला पोलीस अंमलदार, रुचिका जमदाडे यांनी केली आहे. तुकाराम म्हस्के,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *