पिंपरीत बनावट चावीने घरफोडी, पाच तोळ्यांचे दागिने हस्तगत; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई.एकूण १,५०,००० रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिने हस्तगत..

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६.

पिंपरीत बनावट चावीने घरफोडी, पाच तोळ्यांचे दागिने हस्तगत; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई.एकूण १,५०,००० रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिने हस्तगत.

पिंपरी चिंचवड पुणे :- २२/०४/२०२३ (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

सोन्याचे दागीने चोरणारा चोरटा जेरबंद -पाच तोळयाचे दागीने हस्तगत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई.

पिंपरीत पती-पत्नी कामासाठी बाहेर गेले होते. (दि. १७) रोजी नेहमीप्रमाणे दोघेही नोकरीसाठी गेले असताना सायंकाळी ५ च्या सुमारास राहत्या घरातुन सोन्याचे गंठन, मिनी गंठन, सोन्याची ठुशी, अंगठी असा सोन्याचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पिंपरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी पोलीस अंमलदार यांना चोरीच्या तपासाच्या सुचना देवून समांतर तपास सुरु केला.

घटनास्थळी दरवाजाचे कुलूप किंवा कडी-कोयंडा तोडलेला नव्हता. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची सातत्याने वेळोवेळी पाहणी केली. चोरटयाने बनावट चावीचा वापर केला असावा असा संशय बळावला. दरम्यान नेहरुनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा लावुन आरोपीला ताब्यात घेतले. उमेश रमेश भोसले (वय २८ वर्षे, धंदा- हॉटेल कुक, रा. मुळ चिंचोली ता. आवसा जिल्हा लातुर, सध्या शिवदत्त रिसॉर्टमध्ये शिरकोली ता. वेल्हे जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडून सोन्याचे गंठन, सोन्याची ठुशी, सोन्याचे मिनी गंठन व सोन्याची अंगठी असा एकूण १,५०,००० रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिने हस्तगत केले. त्याने ओळखीचा फायदा घेवून बनावटी किल्लीचा वापर करून चोरी केल्याची कबुली दिली. चोरट्याकडे इतर घरफोडी चोरी गुन्ह्यांचे अनुषंगाने सखोल तपास करुन गुन्ह्याचेकामी पिंपरी पोलीस स्टेशनला हजर केले आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री मनोज लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, पोना १९२३ आतिष कुडके, १९२४ नामदेव कापसे, पोकों १९३१ शिवाजी मुंढे, १९२० अजित सानप, २०९७ उध्दव खेडकर यांनी केली आहे.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *