चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा पथकाची जबरदस्त कारवाई .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय

पिपरी चिंचवड पोलिसांची वेगवेगळ्या तीन ठिकानी अवैध धंद्यावर कारवाई . तीनही कारवाईमध्ये एकुण 21,80,886 / – रुकिंचा मुद्देमाल जप्त .

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

पिपरी चिंचवड पोलिसांची वेगवेगळ्या तीन ठिकानी अवैध धंद्यावर कारवाई . तीनही कारवाईमध्ये एकुण 21,80,886 / – रुकिंचा मुद्देमाल जप्त .

दिनांक ०७/०८/२०२१ “ सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या तसेच विनापरवाना अवैधरित्या दारुच्या बाटल्याची विक्री करीता वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई केलेबाबत ”

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

मा , पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक ०६/०८/२०२१ रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन तसेच महालुंगे ( ई ) पोलीस चौकीच्या हद्दीत अवैधरित्या शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या आणि भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत देशी – विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्याची विक्री करीता वाहनातून वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे .

दिनांक ०६/०८/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी ०८:४५ वा चे सुमारास मु.पो. बोहाडेवाडी , मोशी , पुणे येथील पुण्याई सुपर मार्केट नावाच्या दुकानामध्ये इसम नामे बुंदाराम देवासी हा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी त्याच्या दुकानामध्ये प्रतिबंधीत तंबाखूजन्य गुटख्याची साठवणुक करुन विक्री करीत आहे . अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे .

१ ) १,८९ , ७२१ / – रु किं चा तंबाखूजन्य गुटखा

२ ) १४,०२० / – रु रोख रक्कम असा एकुण

३) २,०३,७४१ / – रु किं चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन एक विधीसंघर्षीत बालक तसेच पाहिजे आरोपी नामे

२ ) बुंदाराम मिश्राराम देवासी वय ३८ वर्षे रा . बोहाडेवाडी , मोशी , पुणे यांचेविरुध्द भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं ४१३/२०२१ भादंवि कलम ३२८ , २७२ , २७३ , १८८ , ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे . तसेच दिनांक ०६/०८/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे दुसऱ्या पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी १३:०० वा चे सुमारास मु . वासुली ता . खेड जि . पुणे येथे इसम नामे राणाराम देवासी व रामाराम चौधरी हे त्यांचे महालक्ष्मी नावाचे किराणा मालाचे दुकानामध्ये तसेच इक्को कारमध्ये गुटख्याची साठवणूक करुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करीत आहे . अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी महालुंगे पोलीस चौकी हद्दीत सापळा रचुन छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे .

१ ) १.८८,३२० / – रु किं चा गुटखा

२ ) ४.९ ०,००० / – रु किं ची एमएच १४ जेआर १८५८ क्रमांकाची इक्को कार . असा एकुण

३) ६,७८,३२० / – रु किं चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामे ५ ) रामारास कर्नाराम चौधरी वय २५ वर्षे रा . खालुंब्रे ता . खेड जि . पुणे ( इक्को कार चालक )

२ ) रानाराम चंदाराम देवासी वय ३८ वर्षे रा . दत्ता टिमगिरे यांचे भाड्याचेरुममध्ये , वासुली , ता . खेड जि . पुणे ( दुकानदार ) तसेच पाहिजे आरोपी नामे

३ ) ओम बिष्णोई वय ४५ वर्षे रा . खालुं ता . खेड जि . पुणे ( पुर्ण नाव माहित नाही ) ( गुटखा मालक ) यांचेविरुध्द महाळुगे ( ईं ) पोलीस चौकी येथे गुरनं ९५० / २०२१ भादंवि कलम ३२८ , २७२ , २७३ , १८८ , ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास महाळुगे ( ई ) पोलीस चौकी करीत आहे . तसेच दिनांक ०६/०८/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी १६:३० वा चे सुमारास ऑक्सग्रिन रेसिडेन्सी स्पाईन रोड , भोसरी , पुणे तसेच एल अॅक्सीस सोसायटी समोर स्पाईन रोड , भोसरी , पुणे तसेच पवना सहकारी बँकेच्या समोर , गंर्धवनगर , मोशी , पुणे या ठिकाणाहुन दुचाकी व चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात वाहतूकीचा परवाना नसताना अवैधरित्या दारुची वाहतूक केली जात आहे . अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे .

१ ) ९८,८२५ / – रु किं च्या देशी – विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या .

२ ) १२,००,००० / – रु किं च्या एक दुचाकी व दोन चारचाकी वाहने . असा एकुण

३) १२ , ९८,८२५ / – रु किं चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामे

१ ) सुमित अनंत कसबे वय २४ वर्षे रा . साईकृपा कॉलनी , तापकीरनगर , मोशी , पुणे ( मो.सा. चालक )

२ ) राजेश रमेश परमार वय ४७ वर्षे रा . साहिल रेसिडेन्सी ए -५ स्पाईन रोड , मोशी , पुणे ( रितीक वाईन शॉपचा कामगार )

३ ) विशाल हनुमंत सोनवणे वय २ ९ वर्षे रा . पिरबाबा मंदिराजवळ कुरुळी फाटा , ता . खेड जि . पुणे

४ ) सचिन नारायण पुजारी वय ४१ वर्षे रा . बिल्डींग नंबर जी ९ गंधर्व नगरी , मोशी , पुणे ( ड्रायव्हर व मालक )

५ ) समिर अनिलकुमार पंडा वय ४२ वर्षे रा . जंजिरा हॉटेल , गोडावुन चौक , मोशी , पुणे ( हॉटेल कामगार ) तसेच पाहिजे आरोपी नामे

६ ) रितीक वाईन्सचा चालक – मालक ( पुर्ण नाव पत्ता माहित नाही ) २ ) दिनेश अमरनाथ शेट्टी ( पुर्ण नाव पत्ता माहित नाही ) जंजीरा रेस्टॉ अॅन्ड बारचे मालक यांचेविरुध्द भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं ४१४/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ( अ ) ( ई ) , ८२ , ८३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे .

वरील तीनही कारवाईमध्ये एकुण २१,८०,८८६ / – रु किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , मा . अप्पर पोलीस आयुक्त , श्री . रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप – आयुक्त , ( गुन्हे ) श्री . सुधीर हिरेमठ , मा . सहा . पोलीस आयुक्त डॉ . श्री . प्रशांत अमृतकर , सपोनि डॉ . अशोक डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे , पोउपनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार विजय कांबळे , संतोष बर्गे , सुनिल शिरसाट , नितीन लोंढे , भगवंता मुठे , अनिल महाजन , संगिता जाधव , मारुती करचुंडे , राजेश कोकाटे , गणेश कारोटे , सोनाली माने यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *