पुणे स्टेशन परीसरात प्रवाशांची लुटमार करणा – या गुन्हेगारी टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक -०७ / ०८ / २०२१ बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे स्टेशन परीसरात प्रवाशांची लुटमार करणा – या गुन्हेगारी टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई .

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

दिनांक २३/०६/२०२१ रोजी पहाटे ०४.०० ते ०४.२० वाजता चे दरम्यान फिर्यादी यांस पुणे स्टेशन येथुन वाघोली येथे घेवुन जाण्याच्या बहाण्याने रिक्षामध्ये बसुन थोड्या अंतरावर इतर आरोपी रिक्षामध्ये बसुन मालधक्का चौका कडे जाणारे रोडवर फिर्यादी यास नेवुन मारहाण करुन , चाकुने वार करुन , लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांचेकडील रोख रक्कम व मोबाईल फोन चोरुन नेली आहे.म्हणुन बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि . क्रमांक १४३/२०२१ भादंवि कलम ३९७ , ३९५ , ३२३ , प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . सदर गुन्हयामध्ये टोळी प्रमुखासह ०८ आरोपींना अटक करण्यात आलेली असुन .

१ ) अल्ताफ ऊर्फ बचक्या इक्बाल पठाण ( टोळीप्रमुख ) २ ) सागरऊर्फ पार्थ ज्ञानेश्वर भांडे ३ ) मोहरम ऊर्फ सम्या शफी शेख ४ ) शहाबाज ऊर्फडी शरीफ नदाफ ५ ) राजेश मंगल मंडल ऊर्फ चौपाट्या ६ ) इमाम जलालउद्दीन सय्यद ७ ) महादेव ऊर्फ महादेव गौतम थोरात ८ ) अलिशान ऊर्फ अली रफिक शेख ९ ) जय ऊर्फ नन्या ऊर्फ विलास तुपे वर नमुद आरोपींना अटक करण्यात आली असुन .

त्यांचेकडे सखोल तपास करण्यात आला असुन , त्यांचा टोळी प्रमुख अल्ताफ ऊर्फ बचक्या इक्बाल पठाण या नेत्याचे साथीदारांचे गदतीने सदरचा गुन्हा केलेला आहे . टोळीचे वर्चस्व कायम टिकवण्यासाठी व पुणे स्टेशन येथे येणारे जाणारे प्रवाशांची लुटमार करुन पुणे स्टेशन परीसरात दहशत निर्माण करून स्वतःचा व टोळीचा आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने तसेच टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांनी बंडगार्डन पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये गंभीर गुन्हे केलेले आहेत . दाखल गुन्हयात गोकका कारवाई अंतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी श्री सागर पाटील पोलीस उप – आयुक्त परि .२ पुणे शहर यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे डॉ.संजय शिंदे यांना सादर केला होता . सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर , सदर गुन्हयातील आरोपी हे अल्ताफ कर्फ बचक्या इक्बाल पठाण याचे टोळीतील सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.टोळी प्रमुख अल्ताफ ऊर्फ बचक्या इन्चाल पठाण व त्याचे वर नमुद टोळीतील सदस्य आरोपींनी संघटिलरित्या सदरचा गुन्हा केलेला आहे . आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण करून , काही गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे आरोपी घेऊन नवीन संघटीत टोळी तयार करून एकट्याने व संयुक्तरित्या स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व त्यातुन गैरवाजवी . आर्थिक फायदा मिळविण्याकरीता गुन्हे केलेले आहेत व वेगवेगळ्या आरोपींना घेऊन त्याची संघटना वाढविण्याचे प्रयल चालु केलेले आहेत . आपल्या टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याच्या उददेशाने खुन , दरोडा , दोरड्याची तयारी करणे , मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्ना सहित जबरी चोरी किंवा दरोडा , जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे , अपहरण , विनयभंग , घर फोडी , दुखापत , चोरी , गैरकायद्याची मंडळी जमविणे , सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी सारखे गुन्हेगारी कृत्य आरोपींनी सातत्याने केले आहे.सदर आरोपी यांनी संघटित टोळीच्या माध्यमातुन गुन्हा केलेला असल्याने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चेकलम ३ ( १Xii ) , ३ ( ४ ) या कलमांचा समावेश करणे बाबत अपर पोलीस आयुक्त साो . पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे डॉ . संजय शिंदे यांनी मान्यता दिली असुन , बंडगार्डन पोलीस स्टेशन गुरनं . १४३/२०२१ या गुन्हयामध्ये मोक्का कायदा कलमे समाविष्ट करण्यात आलेली असुन ,

सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री चंद्रकांत सांगळे सहा , पोलीस आयुक्त लष्कर विभाग पुणे शहर हे करीत आहेत , पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , व पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवुन , गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वतः भेट देवुन , कठोर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तिक मार्गदर्शन करून , गुन्हयाचा सखोल तपास करून , गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले होते . त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ४१ वी कारवाई आहे ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *