हुसैन सागर एक्सप्रेसमध्ये गोंधळ – राखीव डब्ब्यात सर्वसामान्य प्रवाशांचा ताबा, प्रवाशांना मोठा त्रास!?apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
हुसैन सागर एक्सप्रेसमध्ये गोंधळ – राखीव डब्ब्यात सर्वसामान्य प्रवाशांचा ताबा, प्रवाशांना मोठा त्रास!
आज तांडूर ते पुणे या मार्गावर येणाऱ्या 12702 हुसैन सागर सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीच्या स्लीपर क्लास (S3 कोच) मध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे दिसून आले. राखीव प्रवाशांसाठी असलेला हा डब्बा संपूर्णपणे सामान्य (जनरल) डब्बा झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

वाडी ते गुलबर्गा आणि सोलापूरदरम्यान या गाडीत ना RPF पोलिस, ना TTE (टिकिट तपासनीस) दिसला. यामुळे चालू तिकीट असलेले, तसेच काही कामगार व इतर विनातिकीट प्रवासी स्लीपर कोचमध्ये घुसले. परिणामी, ज्यांनी पूर्ण तिकीट घेऊन जागा आरक्षित केली होती, अशा प्रवाशांना प्रचंड गैरसोय झाली.

प्रवाशांचे म्हणणे आहे की –
“रेल्वे प्रशासन तिकीटाचे पूर्ण पैसे घेतं, पण सेवा मात्र शून्य आहे. आरक्षित जागांवर बसायलाही जागा मिळत नाही. DRM कार्यालय याकडे अजिबात लक्ष देत नाही.”

रेल्वे प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन, RPF आणि TTE तपासणी सक्तीची करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. अन्यथा, अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे रेल्वे प्रवासात शिस्त आणि सुरक्षा दोन्ही धोक्यात येत आहेत.

✍️ रिपोर्ट : वाजिद एस. खान
ACS Police Crime Squad News
📍 हुसैन सागर एक्सप्रेस, तांडूर – पुणे मार्ग,
