कोंढवा पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हे दाखल.

कोंढव्यातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांचे धाबे दणाणले,
कोंढवा पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हे दाखल.
पुणे शहरातील उपनगर भागातील कोंढवा येथे बघता बघता अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले होते.
दोन-तीन गुंठ्यांत १२-१३ मजल्यांची ईमले उभी राहत होती. बिनधास्तपणे अनधिकृत बांधकामे सुरू असल्याने व अधिकाऱ्यांचे सोईस्कर दुर्लक्ष झाल्याने कारवाई मंदावली होती.
तर बिल्डर मालामाल तर पुणे महानगर पालिका कंगाल? अशी म्हणायची वेळ आली होती. आणि विषेश म्हणजे बघता बघता दोन तीन महिन्यांत मोठ्या इमारती उभे राहत असल्याने त्या इमारती कधी पडू शकतात? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत होते.
तर काहि सामाजिक कार्यकर्ते या बद्दल आवाज उचलत होते. शेवटी पुणे महानगर पालिकेतील बांधकाम विकास विभागाने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरोधात कारवाईचा निर्णय घेऊन अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हे दाखल झाल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
बांधकाम विभागाने पाहाणी करून नोटीसा बजावल्या होत्या. परंतू यानंतरही नोटीसांकडे दुर्लक्ष करून बांधकामांचा सपाटा सुरू होता.
याविरोधात बांधकाम विभागाने संबधित जागा मालक आणि विकसकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ११ जानेवारीपासून विशेष मोहीम राबविली आहे. ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
या मोहीमेसाठी २५ कनिष्ठ अभियंत्यांची टीम नेमण्यात आली आहे. त्यातील एका टिमणे आज गुन्हे दाखल केले आहेत.
स.नं. ४६ कोंढवा खुर्द येथील उजेर सय्यद,सरफराज खान, दादा गायकवाड, एफ.एफ. पठाण यांच्याविरूद्ध महारष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ४३ अन्वये कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केला आहे.
उजेर सय्यद यांच्या ५० बाय ३० फूट जागेवर सात मजल्यांचे काम सुरू होेते. मागच्या वर्षी १४ जानेवारीला तळमजल्याचे अनधिकृतपणे केलेले बांधकाम पाडून टाकण्यात संबधितांना नोटीसही बजावली होती.
परंतू नुकतेच पाहाणी दरम्यान याठिकाणी ७ मजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने सय्यद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दादा गायकवाड यांनी त्यांच्या ४० बाय ३० फूट जागेमध्ये दोन वर्षांपुर्वी बांधकाम सुरू केले होते. त्यावेळी बांधकाम विभागाने नोटीस देऊन मे २०१९ मध्ये प्लिथं बिमपर्यंत झालेले बांधकाम पाडले होते.
परंतू १५ जानेवारीला पाहाणी केल्यानंतर या जागेवर सात मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. आणि मनपा कारवाईच्या भिती पोटी चार मजल्यांचा वापरही सुरु झाला होता. त्यामुळे पालिकेने गायकवाड यांच्या विरोधात पोलीस कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
सरफराज खान यांना जुलै २०१९ रोजी बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी ३५ बाय ७० फुट जागेवर फुटींगचे काम सुरू होते. नोटीसीला विहीत मुदतीत उत्तर न आल्याने पालिकेने बांधकाम पाडून टाकले होते.
दरम्यान नुकतेच १५ जानेवारीला पाहाणी दरम्यान पार्किंगसह सात मजली इमारत उभी राहीली असून तिचा वापरही सुरु करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरफराज खान यांच्यासह त्या इमारतीत राहाणाऱ्यांविरोधात बांधकाम विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफ.एफ. पठाण यांनी देखिल महापालिकेने नोटीस बजावून त्यांचे बांधकामावर कारवाई केल्यानंतर बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने या दोघांविरोधातही कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील फिर्याद भुषण सोनवणे व फारुख पटेल यांनी दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आणखीन काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होण्याचे चिन्ह दिसत आहे.