डान्सरच्या घरावर मारला होता डल्ला घरफोडी करणार्‍याला अटक,१२ लाखाचा ऐवज जप्त. भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे :११/०७/२०२३ – (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

परराज्यामध्ये डान्स कार्यक्रम करण्याकरता गेलेल्या तरुणीच्या घरामध्ये घरफोडी करणा-या चोरटयाकडुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महागडा मोबाईल हस्तगत भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

भारती विद्यापीठ दाखल झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना पोलिस अंमलदार राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांना सदरील गुन्हा हा शुभम अशोक माने याने केल्याची माहिती मिळाली.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांगडेवाडीतील महावीर विहारमध्ये राहणार्‍या डान्सरच्या घरातील १३ लाख १० हजाराचा ऐवज चोरून नेणार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १२ लाख २२ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

शुभम अशोक माने (२३, सध्या रा. फ्लॅट नंबर ४१०, मांगडेवाडी, कात्रज, पुणे. मुळ रा. सर्व्हे नंबर १, भवानी पार्क, मंदार सोसायटी, धनकवडी शेवटचा बसस्टॉप, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.दिनांक २६/०६/२०२३ रोजी ते दिनांक ०९/०७/२०२३ रोजीचे पहाटे ०५/३० वा. दरम्यान फिर्यादी हे लग्नामध्ये डान्सचे कार्यक्रमा करीता गुजरात येथे गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराचे मुख्य दरवाज्याचे लॉक कशाचे तरी सहाय्याने उघडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉकर तोडुन त्यामधुन ५,६०,०००/- रुपये किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याच्या अंगठया, चैन, तसेच ७,५०,००० /- रुपये रोख असा एकुण १३,१०,०००/- रुपये किंमतीचा माल लबाडीच्या इरादयाने चोरी केला आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४५४/२०२३, भांदवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत यांना त्यांचे बातमीदारामार्फेत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा इसम नामे शुभम अशोक माने, वय २३ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ४१०,सुदरतिर्थ अपार्टमेंन्ट, मांगडेवाडी, कात्रज, पुणे याने केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपीतांचा शोध घेवुन त्यास अटक केली आहे. तपास करता त्याचेकडुन गुन्हयातील एकुण १२,२२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत, सचिन सरपाले, आशिष गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधतु जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 98223315W6

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *