Pune. सामाजिक सुरक्षा विभाग, पथकाचा जुगार अड्ड्यावर धडाकेबाज, छापा,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

सामाजिक सुरक्षा विभाग, पथकाचा जुगार अड्ड्यावर धडाकेबाज, छापा,

येरवडा शहरामध्ये, जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभाग,गुन्हे शाखा पुणे शहर, यांनी दिवसभर छापेमारी केली, यावेळी, सुरक्षा विभागाने, आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे, या कारवाईत रोख, ५७००,/रुपये चा
मुद्देमाल जप्त करण्यात आला,

प्रतिनिधी , सगळीकडे बेकायदेशीर धंदे बंद असताना येरवड्यात चालू असलेल्या धंद्यावर पोलीसांनी छापा घातला आहे . सिद्धार्थ नगर मच्छिमार्केटच्या पाठीमागे , कबुतर बिल्डींग येरवडा येथे बेकायदेशीर जुगार खेळत व इतरांना खेळवित असलेबाबतची गोपनिय माहीती पोलिसांना प्राप्त झाली , पोलीस उपनिरीक्षक पंढरकर सामाजिक सुरक्षा विभाग व पोलीस अंमलदार स्टाफ असे सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता

१ ) शंकर शेट्टी रा . ताडीवाला रोड पुणे , २ ) अजय गायकवाड रा . येरवडा पुणे , ३ ) कुमार सोनवणे रा येरवडा हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे सोरट व कल्याण मटका जुगार चिठ्यावर घेत असताना १ ) रविंद्र भगत रा येरवडा , २ ) हरिचंद्र धोत्रे , ३ ) विश्वनाथ सपकाळ रा चिंचवड पुणे ४ ) पांडुरंग लोखंडे रा येरवडा पुणे ५ ) विलास शिंदे , हे जुगार खेळताना मिळून आले ,

त्यांच्याकडील एकूण ५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . त्या सर्वांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ ( अ ) , अन्वये येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

यावेळी अवैद्य धंदा करणाऱ्यांच्या, सामाजिक सुरक्षा विभागाने, मुसक्या आवळल्या ,
दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाई, नंतर, येरवडा शहरामध्ये अवैध धंदे करणार्‍या मध्ये चांगलीच, खळबळ उडाली आहे,

सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक सामाजिक सुरक्षा विभाग , तसेच सामाजिक सुरक्षा विभागाकडील सुप्रिया पंढरकर , पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे , बाबा कर्पे , आण्णा माने , प्रमोद मोहिते , हणमंत कांबळे , संदिप कोळगे , पुष्पेंद्र चव्हाण , प्रताप कदम यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *