धनकवडी उपविभाग वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी लाच घेणारा महावितरणाचा प्रशिक्षणार्थी जाळ्यात,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
अॅन्टी करप्शनच्या पुणे घटकाकडून महावितरण उपविभाग कार्यालय, धनकवडी, पुणे येथील प्रशिक्षणार्थी याचेवर लाच मागणी व लाच स्विकारले प्रकरणी कारवाई.
नवीन खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूर्वीच्या मालकाचे नाव बदलून नवीन नाव लावण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या प्रशिक्षणार्थीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
आशिष ज्ञानोबा क्षीरसागर (वय २५) असे या प्रशिक्षणार्थीचे नाव असून तो महावितरणच्या धनकवडी उपविभाग कार्यालयात कार्यरत आहे.तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावावर एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटच्या लाईट बिलावरील पूर्वीच्या मालकाचे नाव बदलून त्यांच्या आईचे नाव लावण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे महावितरणच्या ऑनलाईन साईटवर अपलोड करुन देण्यासाठी आशिष क्षीरसागर याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी त्याच दिवशी करण्यात आली. त्यात क्षीरसागर याने ८०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर मंगळवारी धनकवडी येथील महावितरण उपविभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ८०० रुपये स्वीकारताना क्षीरसागर याला पकडण्यात आले. सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे.
लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत.
१) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in