हडपसर पोलीस स्टेशनचे दिनेश शिंदे चे विद्यार्थ्यांकडील नशील्या पदार्थांचे नवे आव्हान -दिनेश शिंदे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

विद्यार्थ्यांकडील हत्यारे आणि नशील्या पदार्थांचे नवे आव्हान -दिनेश शिंद.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

हडपसर – शहर व उपनगरांमध्ये कोयता गँगच्या दहशतीच्या घटना घडत असतानाच दुसरीकडे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडेही कोयत्यासारखी हत्यारे आणि नशा आणणारे साहित्य सापडू लागले आहे. त्यामुळे शाळा, पालक व पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीवर वेळीच अंकुश आणण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. शहर व उपनगरांमध्ये कोयता गँगच्या दहशतीच्या घटना घडत असतानाच दुसरीकडे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडेही कोयत्यासारखी हत्यारे आणि नशा आणणारे साहित्य सापडू लागले आहे.

सध्या पोलीस प्रशासनाकडून शहर व उपनगरातील शाळा- महाविद्यालयांमध्ये “पोलीस काका व दिदी’ नावाचा चांगला उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, त्यांना वाईट गोष्टींपासून परावृत्त ठेवणे, निकोप वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी उपाययोजना करणे. अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांची मदत घेणे आदी गोष्टींबाबत या उपक्रमातून विद्यार्थी व शिक्षकांना माहिती देऊन प्रबोधन केले जात आहे.

त्याचा चांगला परिणामही जाणवून येत आहे. मात्र, याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालयात जात असलेल्या पोलिसांना काही विद्यार्थ्यांकडे कोयते, चाकू अशा हत्यारांसह गांजा, बंटा, तपकीर, गुटखा, तंबाखू सारख्या नशा आणणाऱ्या वस्तूही आढळून आलेल्या आहेत. याशिवाय त्यानंतरही शाळा महाविद्यालयात अशी हत्यारे व वस्तू बाळगणारे विद्यार्थी आढळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

या विद्यार्थ्यांची संवाद साधताना काही विद्यार्थी स्वारी म्हणतात, काही एकमेकांवर ढकलून देतात, काही माझा याच्याशी संबंध नसल्याचे खोटे सांगतात, काही स्वसंरक्षणासाठी हत्यार बाळगत असल्याचे सांगतात. सध्या अनेक शाळा महाविद्यालयातून अशी प्रकरणे वारंवार पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे पालक, शिक्षक व पोलीसांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.

ही आहे शाळा महाविद्यालयातील गुन्हेगारी –

मुलींची छेडछाड, रॅगिंग, हत्यारे बाळगून दहशत पसरविणे, नशिले पदार्थ बाळगून त्याचे सेवन करणे, मोबाईल वरून अश्लील चॅटिंग करणे, पालकांची फसवणूक करून पैसे उकळणे., विद्यार्थ्यांमध्ये येत असलेल्या गुन्हेगारीची कारणे -मोबाईलचा अतिरेकी वापर, दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रभाव, नाविन्याचे आकर्षण, कमी झालेला कौटुंबिक संवाद, संस्काराचा अभाव, पालक व शिक्षकांचे दुर्लक्ष, मित्र-मैत्रिणीचे संगत गुण, यावरील उपाय योजना -• पालकांनी पाल्याशी सुसंवाद करणे, शाळा व शिक्षकांशी संपर्कात राहणे, पाल्ल्याची मित्र-मैत्रिणींची माहिती ठेवणे, भरकटणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देणे.• भरकटणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देणे,

• शाळा महाविद्यालयातील वातावरण सुरक्षित ठेवणे, •पोलीस शाळा महाविद्यालयांनी नियमित समन्वय राखणे, पोलीस कारवाई वाढविणे.

‘हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या शाळा महाविद्यालयात “पोलीस काका व दीदी’ उपक्रम सुरू आहे. त्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून प्रबोधन केले जात आहे. सुरक्षित वातावरणातील शिक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. संस्काराचा अभाव व नावीन्याच्या आकर्षणातून विद्यार्थ्यांमध्ये बदल जाणवत आहे. त्यासाठी समुपदेशन व कारवाई केली जात आहे. पालक व शिक्षकांनीही त्या दृष्टीने विचार करून समन्वय व संवाद ठेवला पाहिजे.

अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे

“हडपसर परिसरातील सुमारे पन्नास शाळा महाविद्यालयांना आम्ही पोलीस काका उपक्रमांतर्गत भेटी दिलेल्या आहेत. त्यादरम्यान काही विद्यार्थ्यांकडे नशा आणणारे पदार्थ व हत्यारे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांबरोबर संवाद साधून विद्यार्थ्यांच्या चांगल्या जडणघडणीच्या दृष्टीने उपाययोजना राबवित आहोत.’

दिनेश शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *