पुणे टिंबर मार्केटमध्ये भररस्त्यात खेळत होते पत्त्यांचा जुगार;apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे : टिंबर मार्केटमध्ये भररस्त्यात खेळत होते पत्त्यांचा जुगार; पोलिसांनी केली कारवाई,
पुणे : टिंबर मार्केटमध्ये भर रस्त्यावर जुगार खेळणाऱ्यांवर खडक पोलिसांनी धाड टाकून त्यांना अटक केली त्यांच्याकडून ३ हजार रुपये व पत्त्यांचा कॅट जप्त केला आहे.
गणेश प्रकाश नामदे (वय ३६, रा. भवानी पेठ), धनराज बाबुराव जाधव (वय ४३, रा. काशीवाडी, भवानी पेठ), अक्षय हिरामण लोंढे (वय २९, रा. काशीवाडी, भवानी पेठ), मोहम्मद उबश मोहम्मद यासिन खान (वय ४२, रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलीस अंमलदार यांना बोलावून सांगितले की, टिंबर मार्केटमध्ये उघड्या जागेवर काही जण तीन पत्ती जुगार खेळत आहेत. त्यानुसार खडक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कुलदिप व्हटकर, पोलीस अंमलदार नदाफ, आशिष चव्हाण हे टिंबर मार्केटमध्ये रात्री पावणे पावणेदहा वाजता गेले. तेथे काही जण तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे दिसले. पोलिसांनी छापा टाकून चौघांना पकडले. गणेश नामदे याने सांगितले की, FGBGR मी टेम्पो चालक म्हणून काम करीत असून काम संपल्यावर जुगार खेळत आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक कुलदिप व्हटकर तपास करीत आहेत.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

मुख्य संपादक वाजिद एस खान.9822331526
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in