हडपसर पोलीसांच्या तपासपथकाने वेगवेगळ्या प्रकारच्या गंभिर चोरीच्या गुन्ह्यात ४ आरोपी व २ विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
४८ तासाच्या कालावधीत हडपसर पोलीसांच्या तपासपथकाने वेगवेगळ्या प्रकारच्या गंभिर चोरीच्या गुन्ह्यात ४ आरोपी व २ विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेवुन त्यांचेकडून ०७ गुन्हे उघडकीस आणून किं.रू ५,३०,००० / – चा केला माल हस्तगत ..
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
मागील २ दिवसाच्या कालावधीत हडपसर पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तेच्या व जबरी चोरीच्या गुन्हे दाखल झाले होते . त्यामुळे दाखल गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यांना प्रतिबंध करणे हेच उद्दीष्ठ समोर ठेवून मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण कदम , यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने व अंमलदार यांनी प्लॅन ऑफ अॅक्शन तयार करून गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करीत असताना , पहिल्या प्रकारात हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०१/०८/२०२१ रोजी सेंट्रीग प्लेटा चोरी झालेबाबत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे घडलेले होते त्याबाबत गुन्हे दाखल झाले होते . त्या अनुषंगाने दिनांक ०२/०८/२०२१ रोजी सायंकाळचे वेळेस अचानक तपासपथकाची नाकाबंदी ससाणेनगर येथे राबवून वाहन तपासणी करीत असताना , संशयीत टेम्पो मधून सेंट्रीग प्लेटाची वाहतूक करणारा टेम्पो ३ संशयीतांसह ताब्यात घेवून त्याची पाहणी केली असता , त्यामध्ये ७० सेंट्रीग प्लेटा या मिळून आल्या , त्याबाबत त्यांचेकडे तपास करता आरोपी नामे
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
१ ) साहील अर्जुन कचरावत वय २१ वर्ष रा . स.नं ६८ , सातवनगर हांडेवाडी रोड , गणपती मंदिराजवळ हडपसर पुणे
२ ) अक्षय बाळू शिंदे वय २१ वर्ष रा . पावरहाऊस , सासवड रोड , गणपती मंदिराजवळ , हडपसर पुणे व
३ ) एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ५ ९२ / २०२१ भादंविक ३७९ व ५९३ / २०२१ भादंविक ३७९ हे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले . नमुद आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांचेकडून किं.रू ८०,००० / – च्या ७० प्लेटा जप्त करण्यात आला आहे . दुसऱ्या प्रकारात दिनांक ०१/०८/२०२१ रोजी सायंकळच्या वेळेस फिर्यादी हे जेवणाचे पार्सल आणण्याकरीता सार्थक हॉटेल , सातववाडी रोड , हडपसर पुणे या ठिकाणावरून जात असताना त्यांना अज्ञात ३ आरोपी गाडीवरून उतरून त्यांची गचंडी पकडून , कानाखाली मारून त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन व हातातील दोन अंगठ्या असा किंमती ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता . त्यामुळे वरिल गुन्ह्याची माहीती मिळताच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जावून फिर्यादी यांची भेट घेवून गुन्ह्याची माहीती घेवून संशयीत आरोपींचे वर्णन बाबत माहीती गोळा करून तपासास सुरवात केली असताना , मिळालेली माहीती व संशयीतांचे वर्णन या आधारे संशयीत आरोपी १ ) दशरथ शिवाजी शेलार वय २२ वर्ष रा . महात्मा फुले वसाहत . गंगानगर हडपसर पुणे २ ) तेजस दत्तात्रय खंडागळे वय २० वर्षे रा . महात्मा फुले वसाहत , गंगानगर हडपसर पुणे ३ ) एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करून आरोपींकडून त्यांनी जबरदस्तीने चोरून नेलेली १ तोळे वजनाची सोन्याची चैन व गुन्हा करताना वापरलेली मोपेड असा १,२०,००० / चा माल हस्तगत करून हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५९४ / २०२१ भादंविक ३९२,३४ हा गुन्हा उघडकीस आणला आहे . तिसऱ्या प्रकारात डी.पी.रोड माळवाडी हडपसर पुणे येथे तपास पथकाची पुन्हा एकदा दिनांक ०३/०८/२०२१ रोजी अचानक वाहन तपासणी मोहीम राबवून त्यामध्ये संशयीत वाहन तपासणी करीत असताना , संशयीत आरोपी १ ) पंकज सुरेश शिंदे वय ३३ वर्ष रा . आनंद कॉलनी , द्वारका बाग , धनलक्ष्मी स्विट होम शेजारी , मुंढवा पुणे २ ) सच्छिदानंद शंकर कुसळ वय २५ वर्ष रा . यशवंतनगर चंदननगर पुणे.
यांना त्यांचे ताब्यात मिळून आले पांढऱ्या रंगाची ज्युपीटर अॅक्टीवा नंबर एम.एच.१२.एस.झेड ५६९४ याबाबत विचारपुस करता त्यांनी असमाधानकारक माहीती दिल्याने त्यांना पोलीस स्टेशन येथे घेवून त्यांचेकडे तपास करीत असताना , त्यांनी सदरची मोटार सायकल ही नोवेल हॉस्पीटलचे पार्कीग मधून सुमारे १५ दिवसापुर्वी चोरली असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावावत हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५४१/२०२१ भादंविक ३७९ प्रमाणे दाखल असल्याची माहीती उपलब्ध झाली . नमुद आरोपी यांना दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांचेकडे अधिक कसोशीने तपास करता , त्यांनी यापुर्वी घरफोडी , चैनचोरीचे , वाहनचोरीचे , गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांचेकडून आज रोजी पर्यंत
१ ) चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं २०७/२०२१ भादंविक ३९२,३४ या गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरून नेलेले सोन्याचे गंठण वजन १२.५० ग्रॅमचे हस्तगत करण्यात आले आहे
२ ) मुंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं १५४/२०२१ भादंविक ३७ ९ , ३४ मधिल चोरून नेलेली ज्युपीटर मोपेड क्रमांक एम.एच .१२ पीएक्स ६७३८ ही हस्तगत करण्यात आली आहे .
३ ) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४२६/२०२१ भादंविक ४५४,३८० या गुन्ह्यातीले चोरीस गेले दागिने वजन ४४ ग्रॅम वजनाचे हस्तगत करण्यात आले असून सर्व गुन्ह्यातील हे गुन्हे उघडकीस आले असून किं.रू २.३०,००० / – चा माल हस्तगत केला आहे .
अशापध्दतीने मागिल ४८ तासाच्या कालावधित हडपसर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अथक प्रयत्नातुन २ जबरी चोरीचे गुन्हे , २ सेंट्रीग प्लेटा चोरीचे गुन्हे , २ वाहनचोरीचे गुन्हे , १ घर फोडीचा गुन्हा असे ७ गुन्हे उघडकीस आणून किं.रू ५,३०,००० / – चा माल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , श्री . बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , श्री . राजु अडागळे , पोनि . ( गुन्हे ) श्री . दिगबर शिंदे पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , पोलीस शिपाई शाहीद शेख , शशिकांत नाळे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे , सचिन गोरखे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526