गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक – ०५/०८/२०२१ वाढदिवस साजरा करणेसाठी हातात गावठी पिस्टल घेवुन , गुन्हेगार मयताचे नावाने घोषणा देवुन , केक कापुन दहशत निमार्ण करण्या – या आरोपीस केले जेरबंद गुन्हे शाखा युनिट -२
ONLINE PORTAL NEWS
पुणे शहर दिनांक ०२/०८/२०२१ रोजी सहा.पो.निरी.वैशाली भोसले , पो.हवा .२५७२ जाधव , पो.हवा . ३०८४ शेख , पो.ना .२४६ तारु , पो.शि .१२०३४ चोरमोले व पो.शि .१०१६४ मदने असे युनिट -२ कार्यक्षेत्रात सरकारी वाहन क्रमांक एम.एच .१४ / सी.एल .०२१ मधुन पेट्रोलींग फिरत असताना चामुंडा स्वीट दुकान सुखसागरनगर , पुणे येथे आलो असता आम्हाला व पो.शि .१२०३४ चोरमोले यांना आमचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , इसम नामे अक्षय ऊर्फ प्रसाद कानिटकर रा . बिबवेवाडी पुणे हा मस्जीदचे मागे नवनाथ दत्त मंदीर जवळ बिबवेवाडी पुणे येथे थांबला असुन त्याचेकडे एक पिस्टल आहे . त्याने त्याचे साथीदारांसह बिबवेवाडी पो.स्टे . हद्दीतील रेकॉर्डवरील मयत गुन्हेगार भावेश कांबळे याचा खुन झालेला असुन त्याचा दिनांक ०७/०७/२०२१ रोजी वाढदिस साजरा करणेसाठी त्याचे घराचे समोर १० ते १५ जनांनी जमुन हातात गावठी पिस्टल घेवून मयताचे नावाने घोषना देवुन , केक कापुन दहशत निमार्ण केली होती . अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने वरील पोलीस स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन गुप्तपणे पहाणी करीत असताना मिळालेल्या बातमीतील वर्णनाचा इसम नवनाथ दत्त मंदीर बिबवेवाडी पुणे समोर थांबलेला दिसला . त्यास पकडून ताब्यात घेतले . त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला डावे बाजुस पँटचे आंत किंमत रुपये २५,००० / – रु.चे एक गावठी बनावटीचे पिस्टल खोचलेले , तसेच त्याचे नेसते पँटचे ऊजवे खिशात किंमत रुपये २०० / – रू किचे काडतुस असा सर्व मिळुन २५.२०० / -रु . चा माल मिळुन आल्याने तो जप्त करुन नमुद आरोपीचे विरुध्द आर्म अॅक्ट कलम ३ , ( २५ ) , महाराष्ट्र पोलीस अधि . कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नमुद आरोपीस पुढील कार्यवाहीकामी बिबवेवाडी पो.स्टे . च्या ताब्यात देण्यात आले आहे .
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त , श्री अशोक राळे , मा.पोलीस उप आयुक्त श्री.श्रीनिवास घाडगे , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.सुरेंद्रनाथ देशमुख , पो.निरी.श्री.क्रांतीकुमार पाटील , युनिट -२ गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी.वैशाली भोसले , सहा . फौज.यशवंत आंब्रे , अमंलदार संजय जाधव , किशोर वग्गु , नामदेव रेणुसे , मोहसीन शेख , उत्तम तारु , चंद्रकांत महाजन , चेतन गोरे , मितेश चोरमोले , निखील जाधव , गजानन सोनुने , समिर पटेल , कादीर शेख , गोपाळ मदने यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CRIME REPORTER RAEES KHAN
9881888008