घर फोडी चोरी करणा – या ०२ सराईत चोरटयांना पोलीसांनी केले ४८ तासात जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक – ०७/०८/२०२१ २४ वर्षे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन , पुणे शहर घर फोडी चोरी करणा – या ०२ सराईत चोरटयांना पोलीसांनी केले ४८ तासात जेरबंद

ONLINE PORTAL NEWS

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील गंगाधामचौक परीसरात दि .२९ / ०७ / २०२१ रोजी चोरटयांनी पहाटे ०४/00 वा.ते ०५ / ०० वा.चे सुमारास फिर्यादी नामे डॉ.संजय फत्तेचंद ओसवाल वय- ४८ वर्षे , व्यवसाय डॉक्टर , रा.ए / ५०२.स्वयंभू हिल्स् , मंजुरी , बिबवेवाडी , मार्केटयार्ड , पुणे .३७ यांचे ओसवाल क्लिनिक व इतर साक्षीदार यांचे हबीब हेअर अॅन्ड ब्युटी पार्लर , पी.ए.डायग्नोस्टीक सेंटर देव अंकल किचन , पार्श्व डेंटल क्लिनिक , डॉ.कटारिया क्लिनिक , लाईफ फार्मा मेडिकल व प्रकाश गॉगल असे एकुण ०८ दुकानांचे शटर उचकटुन दुकाने फोडुन सुमारे ३.१७,००० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणुन मार्केटयार्ड पोलीस ठाणेस गु.र.नं.९७ / २०२१ भा.द.वि.कलम ४५४,४५७.३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान पो.शि.स्वप्नील कदम , पो.शि.सुनील पोळेकर यांनी परीसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करुन त्यावरुन आरोपीचा मागोवा घेवुन त्याची ओळख पटवली त्यानुसार पो.शि.स्वप्नील कदम , पो.शि.सुनील पोळेकर यांना दि .०१ / ०८ / २०२१ रोजी बातमी मिळाली की सदरचे आरोपी हे कात्रज येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ येणार आहेत.त्यानुसार सदर ठिकाणी मार्केटयार्ड पोलीस ठाणेकडील पोलीस उप निरीक्षक श्री.संतोष शिंदे , पो.हवा अशोक हिरवाळे .पो.शि स्वप्नील कदम , पो.शि.सुनील पोळेकर पो.ना.विशाल वारुळे पो.शि.अनिरुध्द गायकवाड , पो.शि.भिमा कांबळे , पो.ना.वैभव मोरे , पो.शि.अनीस शेख , पो.शि.संदिप घुले यांनी सापळा रचुन आरोपी नामे १ ) तौसीफ बशीर शेख वय रा.ग.नं.३.शिवनेरीनगर कोंढवा , पुणे.व २ ) अमोल किसन अवचरे वय २४ वर्षे रा .१० नंबर कॉलनी समोर , म्हसोबा मंदिरा शेजारी , काशेवाडी भवानी पेठ , पुणे यांना शिताफीने ताब्यात घेतले नमुद आरोपींना मार्केटयार्ड पोलीस ठाणेस आणुन त्यांचेकडे तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्यांना दाखल गुन्हयात दि .०१ / ०८ / २०२१ रोजी २१/०५ वा अटक करुन त्यांचे कडुन चोरीस गेलेला १.९२.९५८ / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . नमुद आरोपींकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत : १ ) मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं.९७ / २०२१ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे , २ ) स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.नं .१३१ / २०२१ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे ३ ) भारतीविद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.नं .५३४ / २०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे नमुद आरोपी पुणे शहर पोलीसांचे रेकॉर्डवरील आरोपी असुन आरोपी नामे १ ) तौसीफ बशीर शेख वय २४ वर्षे रा.ग.नं.३.शिवनेरीनगर कोंढवा , पुणे याचे वर घरफोडीचे एकुण २४ गुन्हे दाखल असुन आरोपी नामे २ ) अमोल किसन अवचरे वय २४ वर्षे रा .१० नंबर कॉलनी समोर म्हसोबा मंदिरा शेजारी , काशेवाडी , भवानीपेठ पुणे याचे वर घरफोडीचे एकुण १४ गुन्हे दाखल आहेत .

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त.पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर.श्री.नामदेव चव्हाण , मा.पोलीस उप – आयुक्त परीमंडळ ५.पुणे शहर श्रीमती नम्रता पाटील मा.सहा.पोलीस आयुक्त , वानवडी विभाग , पुणे शहर . श्री.राजेंद्र गलांडे वरीष्ठ पोलीस निरीक्षक , मार्केटयार्ड पोलीस स्टेशन , पुणे शहर श्रीमती अनघा देशपांडे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्रीमती सविता ढमढेरे , यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक संतोष शिंदे , पो.हवा . अशोक हिरवाळे पो.शि. स्वप्नील कदम , पो.शि.सुनील पोळेकर , पो.ना.विशाल वारुळे , पो.शि.अनिरुध्द गायकवाड , पो.शि. भिमा कांबळे , पो.ना वैभव मोरे , पो.शि.अनीस शेख , पो.शि.संदिप घुले यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *