काशेवाडी भागातील केकच्या दुकानात ५ लाखांची रक्कम चोराकडून जप्त खडक पोलिसांनी अवघ्या दोन तासात चोरट्याला अटक,खडक पोलीस स्टेशनची कामगिरी,apcs.news
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
काशेवाडी भागातील एका केक मटेरियलच्या दुकानाच्या ड्रावरमध्ये ठेवलेली ५ लाख २५ हजार रुपयांची रोकड चोरट्याने चोरुन नेली. याबाबत तक्रार प्राप्त होताच खडक पोलिसांनी अवघ्या दोन तासात चोरट्याला अटक करुन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे :ऑनलाइन (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान ,
आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय २७ रा. अंजुमन मस्जीद शेजारी, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हाफिजुर रहेमान कयामुद्दीन अन्सारी (वय ५० रा. गिरनार क्लासिक सोसा, अॅक्सीस बँकेच्या वरती, नानापेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि. १५) दुपारी तीन ते सोमवारी (दि.१६) सकाळी आठच्या दरम्यान घडली..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हाफिजुर अन्सारी यांचा काशेवाडी येथे रिगल एजन्सी नावाने केक मटेरियल विक्रीचे होलसेल दुकान आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ते दुकान बंद करुन घरी गेले होते.त्यावेळी आठवडयात व्यवसायातून जमा झालेली ५ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम दुकानातील ड्रावर मध्ये ठेवली होती. तसेच शनिवार व रविवार दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने बँकेत रक्कम भरणा केली नव्हती. त्यानंतर सोमवारी (दि.१६) नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. तसेच ड्रावर मध्ये ठेवलेली रक्कम दिसली नाही. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार चव्हाण व बाबळे यांना माहिती मिळाली की, काशेवाडी येथे राहणारा झुरळ्या ऊर्फ आकाश पाटोळे याने रात्री अशोकनगर कॉलनीत चोरी केली असुन तो पळुन जाण्याच्या तयारीत आहे. पोलिसांच्या दोन पथकांनी त्या ठिकाणी जावुन सापळा रचुन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला दत्त मंदिर जवळील सार्वजनिक शौचालयाजवळून ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडुन गुन्हयात चोरी केलीली ५ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार आहे. खडक पोलिसांनी घरफोडीची तक्रार प्राप्त होताच अवघ्या दोन तासांत चोरी केलेल्या संपुर्ण मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात आयपीसी ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला..

ही कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील,
पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ संदिपसिंह गिल,सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राउत,तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक,पोलीस उप निरिक्षक अजीज बेग, पोलीस अंमलदार संदिप तळेकर, आशिष चव्हाण, सागर घाडगे,मंगेश गायकवाड, सागर कुडले, अक्षयकुमार चाबळे, रफिक नदाफ, लखन ढावरे, समीर तांबोळी,तेजस पांडे, अश्रफ शेख यांचे पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad