६० पेक्षा जास्त गुन्हेगार ला समर्थ पोलीस स्टेशन ने केले अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक ११/०७/२०२२ – ६० पेक्षा जास्त गुन्हेगार ला समर्थ पोलीस स्टेशन केली अटक, तपास पथका ची कामगिरी.
अट्टल सराईत गुन्हेगार फिरोज खान बब्बाली तपास पथका ने केले अटक .
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०६/०७/२०२२ रोजी
आईना मस्जिद समोरील सार्वजनिक रोडवर , नानापेठ , पुणे येथे फिर्यादी व त्यांचे दोन साथीदार यांचे बरोबर किरकोळ कारणावरून भांडणे होवून त्यांना सराईत गुन्हेगार फिरोज मकबुल खान उर्फ बब्बाली व त्याचे बरोबर इतर दोन इसमांनी मारहाण केली होती . सदर बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुं.रं.नं .११६ / २०२२ भादविक ३२६ , ३२३,५०४,५०६,३४ , क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सुनिल रणदिवे , पोलीस उप – निरीक्षक व पोलीस अंमलदार यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन ,
सदर गुन्हयात सराईत गुन्हेगार नामे फिरोज मकबुल खान उर्फ बब्बाली , वय- ४९ वर्षे , रा.ए. डी . कॅम्प चौक , १५४ , नाना पेठ , पुणे याच्या मुसक्या आवळल्या आहेत . तसेच बब्बाली हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर आता पर्यंत एकुण शरीरा विरुध्दचे ६० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत . फिरोज मकबुल खान उर्फ बब्बाली याचेवर यापूर्वी दोन वेळा एमपीडीए कायदयान्वये कारवाई करण्यात आली असून , त्यास तडीपार सुध्दा करण्यात आले होते .तसेच त्याचेवर वेळोवेळी प्रतीबंधात्मक कारवाई सुध्दा करण्यात आलेली आहे .
सदरची कामगिरी ही मा . राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १ पुणे शहर , मा . श्री . सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे श्री . रमेश साठे , वरिष्ठ निरीक्षक , समर्थ पो.स्टे , श्री . उल्हास कदम , निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शना नुसार पोलीस उप निरीक्षक , सुनिल रणदिवे , पोलीस अंमलदार , प्रमोद जगताप , जितेंद्र पवार , रहिम शेख , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , श्याम सुर्यवंशी , गणेश वायकर , एस . पी . आदोडे यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६