पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंतांनी २० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेची कारवाई ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

२० हजारांची लाच घेताना पकडले रंगहात.

पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंतांनी २० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेची कारवाई.


पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंतावर लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

मधुकर दत्तात्रय थोरात वय ५६ , उपअभियंता वर्ग २ , व अजय भारत मोरे वय ३७ , कनिष्ठ अभियंता अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी आज सोमवारी बंडगार्डन पाणीपुरवठा कार्यालय , बंडगार्डन विभाग येथे कारवाई करण्यात आली आहे .

पाण्याच्या टँकरला पास देण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याचे एसीबीने सांगितले.

पुणे : २० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला अटक केली आहे . त्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे .

उप अभियंता मधुकर दत्तात्रय थोरात आणि कनिष्ठ अभियंता अजय भारत मोरे अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत . तक्रारदार यांचा टँकर मार्फत पाणी पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे . त्यासाठी आवश्यक असणारे पास मनपा कार्यालयाकडून त्यांनी घेतले होते . प्रत्येक टँकर भरताना १ पास द्यावा लागतो . मात्र पास देवून देखील कनिष्ठ अभियंता अजय मोरे यांनी दर दिवशी ५ पेक्षा जास्त टँकर भरून पाहिजे असल्यास महिना २० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली .

उप अभियंता मधुकर थोरात यांनी तक्रारदाराचे अनामत रक्कमेचे बील काढण्यासाठी २० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती .

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली . तक्रारीची पडताळणी करण्यात आली . त्यानंतर सापळा रचला . त्यावेळी उप अभियंता मधुकर थोरात आणि कनिष्ठ अभियंता अजय मोरे यांनी प्रत्येकी २० हजार रूपयाची लाच सरकारी पंचासमक्ष घेतली . त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली . बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .

पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे ,अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदिप वऱ्हाडे आणि त्यांच्या पथकाने लोकसेवकांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *