अरे बापरे,,,रेल्वे मध्ये डुप्लिकेट टीसी, वाचा सविस्तर तोतया तिकीट तपासनिसाला दोन दिवसांची पोलिस कोठडी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

अरे बापरे,,, रेल्वे मध्ये डुप्लिकेट टीसी, वाचा सविस्तर

तोतया तिकीट तपासनिसाला दोन दिवसांची पोलिस कोठडी.

https://youtu.be/1uyG8yTTqpMhttps://youtu.be/1uyG8yTTqpM

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

सोलापूर.स्पेशल रिपोर्ट (ACS NEWS) :बार्शी, ता.१०/०२/२०२३ तालुक्यातील खांडवी ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी हे आपल्या मित्रांसोबत रेल्वेने गुरुवारी रात्री मुंबईहून नागरकोईल एक्स्प्रेसने प्रवास करत होते. त्यावेळी प्रवाशांचे तिकीट तपासणाऱ्या टीसीने घातलेला खेळाडूंचा काळा जाकेट, कपाळावरील नाम, गळ्यातील ताईत, घाण कपडे, बोलण्याची स्टाइलमुळे तो बनावट टीसी असल्याचा संशय आला. यामुळे आकाश यांनी बनावट टीसीचा बुरखा दिले. फाडत त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

नागरकोईल एक्स्प्रेसमधील प्रकार; बार्शीच्या तरुणांचे साहस तोतया तिकीट तपासनिसाला अटक.

रेल्वेच्या नागरकोईल एक्स्प्रेसमधील डब्यामध्ये प्रवाशांची तिकीट तपासणी करताना बार्शीच्या तीन सजग तरुणांना तोतया तिकीट तपासनिसाचा संशय येताच त्याला इतर प्रवाशांसमवेत पकडून कर्जत रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हा दाखल करून त्याला कल्याण लोहमार्ग न्यायालयात उभे केले असता, त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

राहुल संजय सोनवणे ((वय ३०, रा. हनुमान बिल्डिंग चौक, उल्हासनगर पूर्व नंबर 3, ता. अंबरनाथ ठाणे), मूळ गाव जळगाव) असे पोलिस कोठडी मिळालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस रवींद्र गावडे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना गुरुवारी (ता.९) कल्याण ते कर्जत दरम्यानच्या रेल्वेमार्गावर घडली. रात्री साडेदहा वाजता कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बार्शी येथील मनीष देशपांडे, आकाश दळवी, आकाश पवार सजग तरुणांना असे तिघेजण नागरकोईल एक्स्प्रेसने कन्याकुमारी येथे जात असताना त्यांच्या डब्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला. डब्यामध्ये एक तिकीट तपासनीस आला. कपाळाला टिळा, अंगात जॅकेट, पायात बूट, हातात कागद-पेन, गळ्यात ओळखपत्र असा पेहराव त्याचा होता. पण सध्या प्रत्येक तिकीट तपासनिसाकडे टॅब असतो, त्यामुळे त्याच्याविषयी यांच्यामध्ये संशय निर्माण झाला. त्यांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यास ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली; तसेच आमचे नाव कागदावरील यादीमध्ये दाखव, असे म्हणताच त्याची भंबेरी उडाली. ओळखपत्र बॅगमध्ये असल्याचे त्याने सांगितले तर कोणते स्टेशन येणार आहे असे विचारता, मोबाईलवर लोकेशन पाहू लागला. त्यामुळे आणखी संशय बळावला.

प्रवाशांना एका टीसीवर संशय आला. यामुळे त्यांनी त्या टीसीला पकडून आमच्या स्वाधीन केले, त्यानंतर ते पुढील प्रवासासाठी निघाले. दरम्यान, त्या इसमाविरुद्ध आयपीसी कलम १७० अंतर्गत तोतयागिरीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे असलेले झेरॉक्स पेज हे दुसया गाडीच्या प्रवाशांचे चार्ट होते. . आनंद लोखंडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक,,कर्जत रेल्वे पोलिस ठाणे

कर्जत रेल्वे स्थानकात येताच रेल्वेच्या पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ज्ञानेश्वर पाटील, सुनील ठाकूर, किरण देवकर यांच्या पथकाने राहुल सोनवणे यास अटक करून शासकीय लोकसेवक नसताना रेल्वेच्या डब्यामध्ये तोतया तिकीट तपासनीस बनून प्रवाशांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक तानाजी सरकाळे तपास करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *