चर्चेत असणारे ऍड.वाजेद खान यांची मागणी कौटुंबिक न्यायालयात व्हॅलेनटाईन डे साजरा करण्याची .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
कौटुंबिक न्यायालयात व्हॅलेनटाईन डे साजरा करण्याची ऍड. वाजेद खान यांची मागणी.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
पुण्यातील एडवोकेट वाजेद खान हे सारखेच सोशल मीडियावर चर्चेत असतातच,आता त्यांनी थेट न्यायाधीशांकडेच मागणी केल्याने लोक अचंबित झाले आहे.फॅमिली कोर्टात थेट व्हॅलनटाईन डे ( लव्ह-डे) साजरा करण्याची मागणी केली आहे.
कोरोना काळात सर्व बंद होते त्यामुळे सर्वांना घरी रहावे लागले यात कामावर जाणारे जोडपे घरी असल्याने पूर्ण वेळ एकमेकांना द्यावा लागला यामुळे एकमेकांना ओळखण्यास वेळ मिळाला, पण अनेकांचा संसार यामुळे मोडला गेला व अनेकांनी एकमेकांविरोधात न्यायालयात धाव घेऊन डीवोर्स घेण्याचा निर्णय घेतला व त्यांचे प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित आहे. डीवोर्स घेणार्या अनेक जोडप्यात पुन्हा प्रेम निर्माण व्हावे व त्यांचे संसार पुन्हा सुरळीत चालावे म्हणून ऍड.वाजेद खान ( बिडकर ) यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना एक वेगळीच मागणी केली आहे.
एकोपा निर्माण व्हावा यासाठी फॅमिली कोर्टात व्हॅलनटाईन दिवसानिमीत्त एखादय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी लेखी मागणी मुख्य न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय यांच्याकडे करण्यात आली आहे.पती पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढावा, प्रेम वाढावे, एकोपा वाढावा यासाठी पुणे येथील कौटुंबिक न्यायालयात ‘व्हॅलेनटाईन डे साजरा करण्याची मागणी ऍड.वाजेद खान ( बिडकर ) यांनी केली आहे १४ फेब्रुवारी २०२३ रोजी .व्हॅलेनटाईन डे ‘आहे .हा दिवस संपूर्ण जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे व्हॅलेनटाईन डे साजरा करावा आणि या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशी ऍड. खान यांनी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना ऍड. खान यांच्या तर्फे देण्यात आले आहे.
१४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलनटाईन दिवस म्हणून साजरा केला जातो. नवरा बायको मधील जवळीक वाढावी,प्रेम वाढावे या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करावे या मागणीचे निवेदन कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना ऍड. खान यांच्या तर्फे देण्यात आले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad