परिमंडळ ५ शोध पथकाची कामगिरी ..मागील ०५ वर्षा फरारी असलेला आरोपीला केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
परिमंडळ ५ शोध पथकाची कामगिरी ..मागील ०५ वर्षा फरारी असलेला आरोपीला केली अटक
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी वेळोवेळी घेतलेल्या बैठकीमागे पोलीस महासंचालक कार्यालयांकडून पुणे शहरांतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे अभिलेखांवर पाहिजे व फरारी असलेले आरोपींची संख्या जास्त असून त्यांचा शोध घेवून त्यांचेवर अटकेची कारवाई होणेबाबत विशेष मोहिम राबविणेबाबत आदेशित केलेले होते. .
त्यानुसार पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- यांचे अधिपत्याखालील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडील वरील कामगिरी करणारे निवडक व माहीतगार अंमलदार यांचे नेमणूक करुन परिमंडळीय ५ यांचे पाहिजे व फरारी असलेले आरोपींचे शोध पथक तयार करणेत आलेले आहे..
नमूद परिमंडळीय ५ चे पाहिजे व फरारी असलेले आरोपींचे शोध पथकातील अंमलदार अमित जाधव व सर्फराज देशमुख यांनी संयुक्तिकरित्या मिळालेले माहितीचे आधारे त्यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे अभिलेखावर मागील ०५ वर्षाचे कालावधीपासून पाहिजे व फरारी असलेला आरोपी नामे:- सुरज किसन माने ऊर्फ समीर राजेश साळुंके ऊर्फ सचिन मोहन काकडे रा. सध्या शनि नगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव बुक, पुणे (यापुवीचे पत्ते ठाणे, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा) हा वरीलप्रमाणे वेगवेगळी नाव वापरून आपले वारंवार वास्तव्याची ठिकाणे बदलत असलेने मागील ०५ वर्षात त्याचा शोध घेणे अत्यंत अवघड झालेले होते. परंतु वरील अंमलदार व त्यांचे पथकाचे इतर अंमलदार यांनी वरील आरोपी बाबत त्यांचे बातमीदारांमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी त्याची माहिती घेवून तो सध्या शनि नगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव बुक पुणे या ठिकाणी वेषांतर करून वास्तव्य करीत असलेबाबत माहिती काढून त्यास शिताफिने नियोजन बद्ध सापळा रचून दि.२५/०२/२०२३ रोजी ताब्यांत घेवून पुढील कार्यवाहीकामी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे स्वाधीन केलेले आहे. नमूद आरोपी हा सध्या मार्केटयार्ड पो.स्टे. गु. रजि.नं. २१५ / २०१८ भा.द.वि.क. ४२०, ४०६ व सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडील पो.स्टे. गु. रजि.नं. ६७५/२०१८ भा.द.वि.क. ४२०,४०६ व आयटी अॅक्ट अशा वेगवेगळ्या ०२ गुन्हयांत पाहिजे आरोपी आहे..
नमूद आरोपीवर यापुर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड आयुक्तालयांत फसवणूकीचे व बाल लैंगिक अत्याचार व आयटी अॅक्ट अंतर्गत वेगवेगळे गुन्हे खालीलप्रमाणे पो.स्टे. ला दाखल आहेत. (हडपसर पो.स्टे. ०१, मुंढवा पो.स्टे. ०१, कोरेगाव पार्क पो.स्टे. ०२. विश्रामबाग पो.स्टे. – ०१, विश्रांतवाडी पो.स्टे. ०२. भारती विद्यापीठ पो.स्टे.०१ व निगडी पो.स्टे. ०१. चिंचवड पो.स्टे. ०१ ) असे एकूण १० गुन्हे दाखल आहे व सध्या पुणे शहरांतील ०२ गुन्हयांत पाहिजे आरोपी आहे..
सदरची कारवाई ही मा. श्री. रितेशकुमार सो. पोलीस शहर, मा. श्री. संदिप कर्णिक सो. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा सो. अप्पर आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख पोलीस उप आयुक्त सो.. परिमंडळ ०५ पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली परिमंडळीय ५ चे पाहिजे व फरारी आरोपी शोध पथकाचे अंमलदार राजू कदम, अमित जाधव, आनंद पाटोळे, सर्फराज देशमुख, नासेर देशमुख, जयदेव भोसले यांनी केली आहे.
(श्रीमती अनघा देशपांडे) मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad