लष्कर पोलीस स्टेशनचे तपास पथकाची कामगिरी. भिकारी असल्याचा सोंग करून घरफोडी करणाऱ्या भिकारी ला लष्कर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली अटक.
ACS POLIC CRIME SQUAD ONLINE PORTAL
दि. ०५/०४/२०२३ (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
लष्कर पोलीस स्टेशनचे तपास पथकाने भिकारी असल्याचा वेष धारण करुन घरफोडी चोरी करणा-या एक इसमाला व मोबाईल विकत घेणा-या एका आरोपीला अटक करुन त्याचेकडून चोरीस गेले १४ महागडे मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली कटावनी असा एकुण ९,४५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
लष्कर पो स्टे गुन्हा रजि नंबर २१ / २०२३ भादवि कलम ४५७,३८० मधील फिर्यादीने फिर्याद दिली की, दि.२२/०१/२०२३ रोजी रात्रौ ०८/०० वा ते दि. २३/०१/२०२३ रोजी सकाळी ०६/०० वाच्या सुमारास फिर्यादीचे पावित इंटरप्राईजेस नावाचे मोबाईल दुकानातुन १७ एमजी रोड कराची स्वीट जवळ कॅम्प पुणे कोणीतरी अज्ञात इसमाने दुकानाच्या शटर तसेच मैन बिल्डींगचे शटर चे लॉक कशाच्यातरी सहाय्याने तोडुन दुकानातील सॅमसंग कंपनीचे १८ मोबाईल, एक मायक्रोसॉप्ट कंपनीचा लॅपटॉप व भारतीय चलनातील रोख रक्कम ०६ लाख असे एकूण १८,१०,५०० /- रुपये चोरीस गेले म्हणुन अज्ञात इसमाविरोधात तक्रार दिल्याने दाखल गुन्हयाचा तपास सुरु असताना.
दिनांक ०१/०४/२०२३ रोजी चोरीस गेले मोबाईलचा तांत्रिक विश्लेशनच्या आधारे तपास चालु असताना मिळालेल्या सीडीआर एसडीआराचे आधारे इसम नामे केदार सुरेश शिंदे वय २३ वर्षे धंदा बिगारी रा. लुहियानगर ५४ एच पी घर नं २०१ गल्ली नं ०२ पुणे यांचा शोध घेवुन तो मिळुन आला त्याचेकडे सदर मोबाईल व गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता सदर मोबाईल हा त्याचा भाऊ अजिक्य शिंदे यांनी मिळुन इसम नामे असिम शब्दी शाहा वय २३ वर्षे धंदा मोबाईल विक्री रा २३७ गणेशपेठ नवाब मजिदजवळ पुणे ०२ याच्याकडुन विकत घेतला असल्याचे सांगितल्याने असिम शब्बी शाहा याचा शोध घेवुन तो मिळुन आल्याने त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषगांने तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कुबल केल्याने त्यांना त्याचे अटकेची कारणे सांगुन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करुन आरोपी नामे १) केदार सुरेश शिंदे वय २३ वर्षे धंदा बिगारी रा लुहियानगर ५४ एच पी घर नं २०१ गल्ली नं ०२ पुणे २) असिम शब्बी शाहा वय २३ वर्षे धंदा मोबाईल विक्री रा २३७ गणेशपेठ नवाब मजिदजवळ पुणे ०२ यांना आज दि.०१/०४/२०२३ रोजी रात्रौ १९/१० दाखल गुन्हयात अटक केली आहे. आरोपीस तपास कामी पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असता पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीने चोरीस केलेल्या मोबाईल पैकी १४ मोबाईल अतिशय माहगडे व गुन्हा करतावेळी वापरलेली कटावनी असा ९,५४,०००/- माल निवेदन पंचनाम्याने मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा तपास श्री. महेंद्र कांबळे पोलीस उप-निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन पुणे हे करत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस उप आयुक्त श्री. स्मर्ताना पाटील, परि. २, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. आर राजे. लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम, श्री राजेश तटकरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रियंका शेळके, सहा पोलीस निरिक्षक शितलकुमार गायकवाड यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस उप निरीक्षक कांबळे, पोशि ३१० कदम, पोहवा ५६७९ कदम, पो हवा ३७११ शिंदे, पो हवा ८४६ चौधर, पो हवा २९८८ भारमळ पो हवा ३०४२ मेंगे, पो हवा चव्हाण, पो हवा मंगेश बो-हाडे परि-०२, पोना ७८९१ कोळी, पो.ना ७८७७ मांजरे, पोना ७६६१ तांबोळी, पोशि राऊत यांनी केलेली आहे.
(राजेश तटकरे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन, पुणे
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad