पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिद्ध आहेत. रात्री बारा वाजता केली #शहराची_पाहणी

Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash is known for his brazen actions. Visited at 12 o’clock at night

पिंपरी, दि.०६ : वेषांतर करून पोलीस गुंडाना पकडतात वेगवेगळे काळे धंदे उघडकीस आणतात .. असं आपण फक्त सिनेमात पाहिलं होत .. पण प्रत्येक्षात मात्र ते घडलय … आणि कुठे तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरात … पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश सध्या वेषांतर करून शहरात फिरतायत .. त्यामुळे नसते उद्योग करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणल्याशिवाय राहणार नाही … पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांनी अहमदनगरमध्ये गुन्हेगार टोळ्यांवर जी कारवाई केली त्यानंतर त्यांचं नाव महाराष्ट्रभरात चर्चेत होते..

सध्या शहरामध्ये कोरोनाने जसा उचांक गाठलाय तसेच या महामारीत आपला हाथ साप करून घेणाऱ्यांची देखील मजल वाढलीये … त्याच अनेक काळे धंदे करणाऱ्यांच्या अनेक गोष्टी या आयुक्तांच्या कानावर गेल्या आणि त्यांनी हि अनोखी युक्ती लढवली … आता या सगळ्या नाट्यात त्यांना नेमके कशा कशाचे धागेदोरे सापडले हे अजूनही गुलदस्त्यात आहे ..

पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश बुधवारी रात्री चक्क वेशांतर करून मिया जमालखान कमालखान पठाण बनले होते… स्वतः कृष्ण प्रकाश हे त्यांच्या पिळदार मिशीमुळे ओळखले जातात… रात्री त्यांनी मिया सारखी दाढी चिटकवली…डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग चढवला…मेकअप आर्टीस्टने त्यांचा गेटअप, लूक पुरता बदलून टाकला… सलवार, कुर्ता आणि तोंडावर मास्क… बरोबर मियाची बिवी म्हणून सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यासुध्दा वेशांतर करून होत्या… खासगी टॅक्सी करून ही मियाबिवीची जोडी प्रथम रात्री १२.१५ वाजता पिंपरी पोलिस स्टेशनला धडकली… आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल ८००० रुपये सांगितले, अशी तक्रार घेऊन ते आले.. ‘रुग्णवाहिका वाला आम्हाला अक्षरशः लूटतोय, तुम्हा तक्रार दाखल करून घ्या’, असा आग्राह या जोडीने धरला होता… सामान्य माणसाला यायचा तोच अनुभव दस्तुरखुद्द पोलिस आयुक्तांनाही आला… “हे आमचे काम नाही”, म्हणून त्यावेळी हजर पोलिसाने थेट आयुक्तांनाच आला… कृष्ण प्रकाश यांनी मास्क काढून त्याला ओळख दिल्यावर त्या पोलिसाची अक्षरशः ततंरली…

दुसरा छापा रात्री १.३० वाजता हिंजवडी पोलिस स्टेशन आणि नंतर मध्यरात्री २ वाजता वाकड चौकीवर झाला… त्या ठिकाणी “आम्ही आमच्या रमजानचे उपवास ठेवतो…, परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो… काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला कंबरेत लाथा घातल्या. झटापटही झाली आणि त्यात एकाचा मोबाईल हातात आला…”, अशी गंभीर तक्रार हिंजवडी पोलिसांना दिली. त्यावेळी ड्युटीवर हजर पोलिसाने खूप गाँभिर्याने सर्व प्रकऱणाची माहिती घेतली आणि कच्ची फिर्याद तयार केली…आपण वरिष्ठांना बोलावतो, ते इतक्यात येतील तोपर्यंत थांबण्याची विनंतीही केली… हा सगळा ड्रामा झाल्यावर पोलिसा आयुक्तांनी आपली ओळख दाखविल्यावर तो कावराबावरा झाला होता…

माध्यमांशी बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले, वाकड आणि हिंजवडीत खूप चांगला अनुभव आला, मात्र पिंपरीत वाईट अनुभव होता.. आपला स्टाफ खरोखर कसे काम करतो, तक्रारदारांना कशी वागणूक देतो याची तपासणी करण्यासाठी आपण यापुढेही अशाच प्रकारे अचानक धाडी टाकणार आहोत. कुठे दारू, मटका अड्डे असो वा कुठलाही काळा धंदा ज्याला समाजाला त्रास होतो तो बंद झालाच पाहिजे. शहरात शून्य टक्का काळे धंदे हे आपले टार्गेट आहे. त्यासाठी आता आपण स्वतः न सांगता कुठेही अचानाक छापे टाकणार आहोत. त्याला जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिककाऱ्यावर कठोर कारवाईसुध्दा कऱणार आहोत… शहर भयमुक्त करायचे आहे…

पोलिसांबद्दल जनतेच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण कऱणे… पोलिस लोकाभिमुख व्हावा आणि शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी आपण अधिक आक्रमक पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले… नांदेड, अहमदनगरचा आपला अनुभव त्यांनी सांगितला…

त्यांनी शहरात आल्यापासून अनेक अवैध उद्योग धंद्यांवर कारवाई केली.. आणि त्यांनी म्हटल्या प्रमाणे शहरात वेषांतर करून कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती घ्यायला देखील सुरुवात केली… त्यामुळे या कठीण काळात जर मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांनी खबरदार… कारण आता गय कोणाचीही केली जाणार नाही असा इशारा खुद्द पोलीस आयुक्तांनीच दिला… वेषांतराची हि चित्रे पाहून तुम्हीही अवाक व्हाल.. मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही असा म्हणताच त्यांनी या शहरात दणक्यात एंट्री केली होती…

ते या शहरात येण्यापूर्वी त्यांनी या शहराचा सखोल अभ्यास केलाय.. त्यामुळे कुठे काय दडलंय आणि कोण किती पाण्यात आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे….. लोकप्रतिनिधींच्या चांगल्या कामात त्यांना मदत करेल पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणार नाही असा थेट इशाराच त्यांनी दिलाय… त्यामुळे सध्यातरी या शहरातील काही नेतेमंडळी शांत आहेत.. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची दहशत फक्त गुन्हेगारांमध्येच नाही तर चुकीचं काम करणाऱ्या लोकांमध्ये तसेच काही स्थायिक नेतेमंडळींमधे पण आहे, हे या निम्मिताने स्पष्ट होतंय … या कोरोना काळात होणा ऱ्या रुग्णांच्या लुटमारीवर ते आळा बसवतील यात काहीच शंका नाही..

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *